पाकिस्तानातील दारा आदमखेल कोहाट येथील कोळशा खआणीच्या सीमेच्या वादात सोमवारी दोन जमातींमध्ये राडा झाला. यामुळे जवळपास १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघेजण जखमी झाले आहेत. ARY या पाकिस्तानी न्यूज चॅनेलनच्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
कोळसा खाणींच्या हद्दवाढीच्या वादातून सुनिखेल आणि अखोरवाल या दोन राष्ट्रांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. बुलंदरीच्या डोंगरी भागात राहत असलेल्या दोन जमातींममध्ये या सीमावादावरून वाद झाला. या वादात हिंसा भडकल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. तसंच, दोनजण जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
बुलंदरी टेकडीच्या सीमा वादावरून सुनिखेल आणि अखोरवाल राष्ट्रांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. तसंच, या दोन जमातींमध्ये बैठकही आयोजित करण्यात आली होती. परंतु, तरीही या दोन जमाती एकमेकांसमोर भिडल्या आणि १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी धाव पोलिसांनी तत्काळ परिस्थित नियंत्रणात आणली. या दोन जमातींमध्ये दीर्घकाळ वाद सुरू आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून जखमींना पेशावरमधील रुग्णलायात दाखल करण्यात आळी आहे, अशीही माहिती एआरवाय न्यूजने दिली आहे.