* पाकिस्तानला खडासावूनही आगळीकता सुरूच
जम्मू-काश्मिरमधील पूँछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनादरम्यान, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यामधील भेटीनंतर पाकिस्तानी सैन्याने केलेला शस्त्रसंधी भंग अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा मानला जात असताना पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळिकेचे दर्शन घडविले आहे.
भारतीय लष्कराचे प्रवक्ते एस.एन.आचार्य़ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने यावेळी स्वयंचलित शस्त्रांचा वापर करुन भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. हा गोळीबार सुमारे तासभर सुरू होता. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. यात कोणत्याही प्रकारची जीवतहानी झाली नसल्याचेही आचार्य यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2013 रोजी प्रकाशित
सीमारेषेवर पाकसैन्याचा जोरदार गोळीबार
* पाकिस्तानला खडासावूनही आगळीकता सुरूच जम्मू-काश्मिरमधील पूँछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथील भारतीय चौक्यांवर

First published on: 02-10-2013 at 12:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan again fires along loc