पाकिस्तान हा आपला शेजारी असून भारतालाही त्यांच्याबरोबर चांगले संबंध राखायचे आहेत. मात्र, त्यासाठी पाकिस्तानकडूनही काही पाऊले उचलली गेली पाहिजेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यासाठी सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने होणारे शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रकार थांबणे गरजेचे असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला नवाज शरीफ यांना आमंत्रित करून भारताला पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची मनापासून इच्छा असल्याचा संदेश दिला होता. मात्र, तरीही पाकिस्तानकडून सातत्याने सीमारेषेवरील भारतीय चौक्यांवर अकारण गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय लष्कराकडून वारंवार पराभूत होऊनही पाकिस्तानचे हे प्रकार सुरूच असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच भारतीय लष्कराला पाकच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2015 रोजी प्रकाशित
‘चांगले संबंध राखण्यासाठी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवावे’
पाकिस्तान हा आपला शेजारी असून भारतालाही त्यांच्याबरोबर चांगले संबंध राखायचे आहेत.
First published on: 03-01-2015 at 12:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan fires at india again rajnath orders appropriate response