४ आणि ५ मे रोजी गोव्यात ‘शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’मधील (SCO) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात दाखल झाले. मागील १२ वर्षांत पहिल्यांदाच पाकिस्तानच्या मंत्र्याने अशाप्रकारे भारत दौरा केला. हा दौरा भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

मात्र, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एससीओच्या बैठकीदरम्यान पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या भारतात आगमनावर भाष्य करताना एस जयशंकर म्हणाले, भुट्टो यांनी SCO मधील सदस्य देशाचे परराष्ट्र मंत्री म्हणून भारताला भेट दिली आहे. हा बहुपक्षीय मुत्सद्देगिरीचा एक भाग आहे. या भेटीकडे विशेष महत्त्वाची भेट म्हणून पाहू नये, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
rajnath singh on pakistan
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा

“SCO चं सदस्यराष्ट्र असणाऱ्या एका देशाचे परराष्ट्रमंत्री भुट्टो यांना योग्य तीच वागणूक देण्यात आली आहे. पाकिस्तानात केंद्र असणाऱ्या दहशतवादाचा पुरस्कार करणारे, त्याचं समर्थन करणारे आणि त्याचं प्रवक्तेपद मिरवणाऱ्या भुट्टोंच्या यासंदर्भातल्या भूमिका SCO बैठकीतच योग्य प्रकारे खोडून काढण्यात आल्या आहेत,” असं एस जयशंकर यांनी म्हटलं.

जयशंकर पुढे म्हणाले की, दहशतवादावर बोलून आम्ही मुत्सद्दीगिरीत गुण मिळवत नाही आहोत. आम्ही राजकीय आणि मुत्सद्दीपणे पाकिस्तानला जगासमोर उघडं पाडत आहोत. दहशतवादाचा पीडित म्हणून आम्हाला असं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही केवळ दहशतवादाचं पोषण करत नाहीयेत, तर तुम्ही मला म्हणाले की, कृपा करून दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलू नका, ही बाब माझ्या दृष्टीने त्या देशाच्या मानसिकतेबद्दल खूप काही बोलून जाते. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची विश्वासार्हता त्यांच्या विदेशी चलनसाठ्याच्या तुलनेत झपाट्याने कमी होत आहे.