पाकिस्तानकडे भारतापेक्षा १० अण्वस्त्रे जास्त आहेत, असे बुलेटिन ऑफ द अॅटॉमिक सायंटिस्ट डाटा या नियतकालिकाने म्हटले आहे.
न्यूक्लियर नोटबुकमधील माहिती आरेखनात १९८७ पासून केलेल्या निरीक्षणाआधारे अण्वस्त्र साठय़ाची माहिती दिली आहे त्यानुसार १९९७ पर्यंत दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे नव्हती. १९९८ मध्ये दोन्ही आशियायी देशांनी अणुचाचण्या केल्या, त्यावेळी भारताकडे तीन तर पाकिस्तानकडे एक अण्वस्त्र होते. १९९९ मध्ये पाकिस्तानकडे आठ अण्वस्त्रे होती. पाकिस्तानकडे २००० मध्ये १४ अण्वस्त्रे होती तर भारताकडे १३ अण्वस्त्रे होती.
२००७ मध्ये पाकिस्तानकडे ६० तर भारताकडे ५० अण्वस्त्रे होती, त्यामुळे पाकिस्तानकडे आपल्यापेक्षा दहा अण्वस्त्रे जास्त आहेत. २०१३ च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानकडे १२० तर भारताकडे ११० अण्वस्त्रे आहेत.
चीनकडे ४८०४, रशियाकडे ४४८०, फ्रान्सकडे ३०० अण्वस्त्रे आहेत त्यामुळे २०१३ मधील एकूण अण्वस्त्र साठा १०१४४ आहे. ब्रिटनकडे २२५, तर इस्रायलकडे ८० अण्वस्त्रे आहेत. १९८० मध्ये जागतिक अण्वस्त्र साठा अमेरिका व रशिया या दोन गटांमध्ये विभागला गेला होता. त्यावेळी एकूण ५५,२५५ अण्वस्त्रे होती त्यात रशियाकडे ३०,००० तर अमेरिकेकडे २४,००० अण्वस्त्रे होती. त्यानंतर १९८६ मध्ये अण्वस्त्रांची संख्या ६४,००० होती .
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2015 रोजी प्रकाशित
पाकिस्तानकडे भारतापेक्षा १० अण्वस्त्रे अधिक
पाकिस्तानकडे भारतापेक्षा १० अण्वस्त्रे जास्त आहेत, असे बुलेटिन ऑफ द अॅटॉमिक सायंटिस्ट डाटा या नियतकालिकाने म्हटले आहे.
First published on: 11-03-2015 at 03:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan has more nukes than india