एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धसंघर्ष संपलेला नाही. या युद्धात दोन्ही देशांना जीवित तसेच वित्तहानीला तोंड द्यावं लागलंय. तसेच युक्रेनमध्ये लाखो लोकांना स्थलांतर करावं लागलं आहे. युक्रेनमध्ये हवाईहल्ले, बॉम्बहल्ले, गोळीबार यांची मालिका सुरु असताना आता पाकिस्तानमधील सियालकोट येथे लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील सियालकोटमधील लष्कराच्या ताब्यात असलेल्या भागात अनेक स्फोट झाले आहेत. सुरुवातीला एक स्फोट झाल्यानंतर लागोपाठ स्फोटांची मालिकाच या भागात पाहायला मिळाली. पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या या ठिकाणी दारुगोळा ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

या स्फोटात अद्याप कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र पाकिस्तानी लष्कर या स्फोटाची पुष्टी करत आहे. तर उर्दू दैनिक द डेली मेलने या स्फोटाबद्दल सांगताना “सियालकोट येथील लष्करी तळावर मोठा स्फोट झाला आहे. दारुगोळा ठेवलेल्या ठिकाणी हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. स्फोटानंतर या भागात मोठ्या प्रमाणात आग लागली असून स्फोटाचे नेमके कारण समोर आलेले नाही,” असं ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan massive explosion reported in sialkot cantonment area detail awaited prd
First published on: 20-03-2022 at 13:33 IST