अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी पाकिस्तान हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र नसल्याचे वक्तव्य केले. तसेच पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणाचा त्याग करणारही नाही असा दहशतवाद्यांना छत्रछाया देणारा पाकिस्तान हा देश आहे. असेही गेट्स यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर अल कायदा या दहशतवादी संघटनेचा कुख्यात म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तान सैन्याला अपमानित करण्यासाठीच थेट त्यांच्या येथे जाऊन छापा घालून ठार करण्यात आले असल्याचे मत गेट्स यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानमध्ये ओबामाला ठार करण्याच्या उद्देशाने हल्ल्यासाठी कोणाची मदत अथवा परवानगी घ्यावी, असा विचारही कोणाच्या मनी आला नाही. कारण, पाकिस्तान सैन्याला यातून त्यांची जागा दाखवून देण्याचाच उद्देश होता आणि अशाप्रकारे छापा घालून लादेनला ठार करण्यात आले. असे रॉबर्ट गेट्स यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
गेट्स यांनी २०१० साली पाकिस्तानला दुसरी व अखेरची भेट दिली होती. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी, पंतप्रधान युसुफ रझा गिलानी व सैन्यप्रमुख अश्फाक परवेझ कयानी यांची भेट घेतली होती. “या भेटीवरून परतताना पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे धोरण कधीही सोडणार नाही, अशी माझी खात्री झाली,’ असे गेट्स यांनी या पुस्तकामध्ये स्पष्ट केले आहे. तसेच “माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये इतर कोणत्याही प्रशासनाने पाकिस्तानबरोबर काम आणि चर्चा करण्यात इतका वेळ व शक्ती खर्च केली नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारताला धोका पोहोचविणाऱया दहशतवादाचा मूळापासून नायानाट करण्यासाठी एकत्र काम करणे गरजेचे होते. मात्र, काहीच झाले नाही सर्व भेटी निष्फळच ठरल्या.” असेही गेट्स आपल्या पुस्तकातून स्पष्ट करतात.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तान हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र नाही- रॉबर्ट गेट्स
अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी पाकिस्तान हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र नसल्याचे वक्तव्य केले. तसेच पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणाचा त्याग करणारही नाही असा दहशतवाद्यांना छत्रछाया देणारा पाकिस्तान हा देश आहे.

First published on: 09-01-2014 at 04:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan not an ally of us gates