जम्मू जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पुन्हा एकदा आगळीक केली. छोटय़ा शस्त्रांनी गोळीबार करून तोफांचा माराही केला त्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानच्या रेंजर्सनी या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या तीन ठाण्यांना लक्ष्य केले होते. अखनूर क्षेत्रात सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला पाकिस्तान रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची आगळीक केली.
पाकिस्तानला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवळपास एक तास ही धुमश्चक्री सुरू होती. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2015 रोजी प्रकाशित
पाकिस्तान रेंजर्सकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
जम्मू जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची पुन्हा एकदा आगळीक केली
First published on: 02-08-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan open fire against india