संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर संयुक्त राष्ट महासभेत काय बोलावं हे सुचेनासं झाल्यानंतर पाकिस्तानने योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे राजदूत साद वराईच यांनी रविवारी बिनबुडाचे भाषण केले. आजच्या असहिष्णु भारतामध्ये मतभेदांसाठी जागा नाही. आरएसएस भारतामध्ये दहशतवाद आणि हुकुमशाही पेरत आहे असा आरोप साद वराईच यांनी केला आहे. ज्या देशांमध्ये मस्जीद आणि चर्च जाळली जातात त्यांना दुसऱ्यांना बोलण्याचा कोणताही आधिकार नाही असेही साद म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचा वैचारिक गुरू असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हुकुमशाहीचा प्रसार करीत असल्याचा आरोप केला. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे दूत साद वारीच यांनी स्वराज यांच्या भाषणाला उत्तर दिले. वारीच यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही लक्ष्य केले. ‘‘सर्व भारतभर धार्मिक श्रेठत्वाच्या नावाखाली बिनदिक्कत अत्याचार केले जातात. आजच्या स्वतंत्र भारतात मतभिन्नतेला जागा नाही. योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शाखांमधून हुकुमशाहीचा प्रसार करतात’’, अशी टीका त्यांनी केली.

‘‘हुकुमशाहीचा प्रचार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा हेच आमच्या भागातील दहशतवादाचे जन्मस्थान आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशची ओळख कट्टर हिंदूूराज्य अशीच आहे. तेथे हिंदूू कट्टरवादी खुलेआम धार्मिक वर्चस्व गाजवतात. कट्टर हिंदुत्ववाद्यांचे जमाव ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजासह अन्य अल्पसंख्यांकांच्या खुलेआम हत्या करतात. त्याचबरोबर कट्टर हिंदूुत्ववादी असलेले मुख्यमंत्री आदित्यनाथ अशा गुन्ह्य़ांना पाठीशी घालतात, असा आरोपही वारीच यांनी केला.

काय म्हणाल्या होत्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज

शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला खडे बोल सुनावले. आज दहशतवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचला आहे. भारत कित्येक वर्षांपासून दहशतवादाची झळ सोसतोय. महत्वाचं म्हणजे दहशतवादाचे हे आव्हान कुठल्या दूरच्या देशामुळे नव्हे तर शेजारी देशामुळे निर्माण झाले आहे. हा देश दहशतवाद पसरवण्यातच नव्हे तर दहशतवादाचे आरोप फेटाळून लावण्यातही माहीर आहे अशी बोचरी टीका स्वराज यांनी केली होती. अमेरिकेवर ९/११ हल्ला करणारा ओसामा बिन लादेन अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू होता. अमेरिकेने आपल्या सैन्य क्षमतेच्या बळावर पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले पण हे सत्य समोर आल्यानंतर आपण काही गुन्हा केलाय असे पाकिस्तानला वाटत नव्हते. अजूनही तसेच सुरु आहे. ९/११चा मास्टर माईड मारला गेला पण मुंबईत २६/११ चा हल्ला घडवणारा हाफिज सईद पाकिस्तानात मोकळा फिरतोय.

सत्ता बदलली पण पाकिस्तान नाही, संयुक्त राष्ट्राच्या सभेत भारताचा पलटवार

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिव इमन गंभीर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. ‘पाकिस्तानमध्ये नवीन सरकार आल्यानंतर काही बदल होईल असे वाटले होते. मात्र आधीच्या आणि आताच्या पाकिस्तानमध्ये काहीही बदल झाला नाही. आम्ही येथे नवीन पाकिस्तानला ऐकण्यासाठी आलो होतो. मात्र येथे आल्यानंतर पाकिस्तानमध्ये काहीही बदल झाल्याचे जाणवले नाही. पाकिस्तानच्या कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यांची शैली पूर्वीप्रमाणेच आहे.’ असे गंभीर म्हणाल्या.  ‘पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करून स्वत:च्या विकासाकडे लक्ष द्यावे. पाकिस्तान शेजारील देशावर हल्ला करण्यासाठी दहशतवादाची निर्मीती करतेय.’ पाकिस्तानमध्ये भारत दहशतवाद पेरत असल्याचा आरोप यावेळी इनम यांनी फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, पाकिस्तान बिनबुडाचे आरोप करत आहे.

पाकिस्तानकडून अणुबॉम्बची धमकी

भारताकडून सतत एलओसीवर सीजफायरचं उल्लंघन केलं जातं. आम्हाला हे सांगायचंय की आमच्या संयमाचा अंत पाहू नका. भारताने एलओसी पार केली किंवा लिमिटेड वॉरचा प्रयत्न केला तर त्यांना मोठा पलटवार झेलावा लागेल. दक्षिण आशियामध्ये न्युक्लिअर संतुलन ठेवण्याची बातचीत केली जाते. पण पाकिस्तान न्युक्लिअर शस्त्रांचा वापर न करण्याची खात्री देऊ शकत नाही, असं कुरैशी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan rakes up rss yogi adityanath nrc to attack india at un
First published on: 30-09-2018 at 21:49 IST