Pakistan Twitter Account Withheld In India: जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने पाकिस्तान सरकारचे ट्विटर हॅण्डल भारतात दिसणार नाही अशा रीतीने स्थगित केले आहे. शनिवारी सकाळी ही कारवाई ट्विटरकडून करण्यात आली. भारतातील कायद्यांनुसार पाकिस्तानचे ट्विटर खाते भारतीय युजर्सना दिसू नये अशी मागणी केंद्र सरकारने ट्विटरकडे केली होती. या मागणीनुसार ट्विटरने ही कारवाई केली आहे.

२०२२ च्या सुरुवातीला समोर आलेल्या डेटाबेस नुसार, ट्विटर वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक होता. तसेच कॉन्टेन्ट ब्लॉकिंग (एखादे ट्वीट दिसू नये यासाठी केली जाणारी विनंती) करणाऱ्या देशांमध्येही भारताचा क्रमांक पाचवा होता.

पाकिस्तानच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती

दरम्यान ट्विटरने नमूद केल्याप्रमाणे, २०२१ च्या शेवटच्या सहा महिन्यांत, व्हेरीफाईड पत्रकार आणि वृत्त कंपन्यांच्या खात्यांद्वारे पोस्ट केलेला कॉन्टेन्ट ब्लॉक करण्यासाठी ३२६ कायदेशीर मागण्या प्राप्त झाल्या होत्या, ब्लॉकिंगच्या एकूण मागण्यांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त म्हणजेच ११४ मागण्या भारताकडून केल्या गेल्या होत्या. ट्विटरवरील माहिती ब्लॉक करण्याची मागणी करणाऱ्या देशांमध्ये भारतासह टर्की, रशिया व पाकिस्तान या राष्ट्रांचाही पहिल्या चार देशांमध्ये समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या कॅनडास्थित दूतावासाच्या अकाऊंटवरून एक ट्वीट करण्यात आले होते ज्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे समर्थन करण्यात आले होते. या ट्वीटचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच मागील आठवड्यात ईडी आणि एनआयएने पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. या तळांवरून पीएफआयचे दहशतवादी संघटना अल कायदा आणि इतर संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाल्याचे तपासणी संस्थांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानी सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात स्थगित करणे ही महत्त्वाची कारवाई ठरली आहे.