सीबीआयकडून नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे प्रकरण लालूप्रसाद यादव यांना भेट म्हणून मिळालेल्या जमिनीचं आहे. भेट म्हणून जमीन द्यायची किंवा जमीन विकण्याच्या बदल्यात रेल्वेत नोकरी मिळवायची या मुद्द्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. २००४ ते २००९ या कालावधीत लालूप्रसाद यादव हे केंद्रीय रेल्वे मंत्री होते. या प्रकरणी आता सीबीआयने लालूप्रसाद यादव यांची चौकशी सुरू केली. मात्र माझ्या वडिलांना नाहक त्रास दिला जातो आहे असं लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.

काय आहे रोहिणी आचार्य यांचं ट्विट?

रोहिणी आचार्य यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या बाबांना सातत्याने त्रास दिला जातो आहे. जर त्यांना काही झालं तर मी कुणालाही सोडणार नाही. माझ्या बाबांना अशा प्रकारे त्रास देणं हे योग्य नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातील. वेळ खूप बलवान असते, यात खूप ताकद असते हे कुणीही विसरू नये. आज आमची वेळ असेल तर उद्या तुमचीही वेळ येऊ शकते या आशयाचं ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलं आहे.

सीबीआयने सोमवारी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची पाच तास चौकशी केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयची दोन पथकं एका कारमध्ये आली त्यांनी मंगळवारी मीसा भारती यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी दिवसभर चालणार आहे असंही सांगण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की सीबीआय या प्रकरणात षडयंत्र काय होतं? नेमका काय भ्रष्टाचार झाला होता. तो यापुढे घडू नये म्हणून लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आणि तर १४ जणांच्या विरोधात आम्ही आरोपपत्र दाखल केलं आहे. या सगळ्यांना १५ मार्च पर्यंत न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स पाठवले आहेत. या प्रकरणातली पुढील चौकशी आत्ता केली जाते आहे. लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळ्यात पकडले गेले होते तसंच ते आत्ता आजारी आहेत.