नववर्षांच्या मध्यरात्री अरबी समुद्रात स्फोट होऊन बुडालेल्या पाकिस्तानच्या जहाजावरील चौघे जण हे संशयित दहशतवादीच असल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यानुसार स्पष्ट होत असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले असल्याचे वार्ताहरांनी राजनाथ सिंह यांना विचारले असता त्यांनी वरील बाब स्पष्ट केली. मात्र परिस्थितीजन्य पुराव्याबाबत अधिक भाष्य केले नाही. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार त्या जहाजावरील चौघे जण हे दहशतवादी अथवा संशयित दहशतवादीच असल्याचे आणि ते सातत्याने पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘त्या’ जहाजावरील चौघे संशयित दहशतवादीच
नववर्षांच्या मध्यरात्री अरबी समुद्रात स्फोट होऊन बुडालेल्या पाकिस्तानच्या जहाजावरील चौघे जण हे संशयित दहशतवादीच असल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यानुसार स्पष्ट होत असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

First published on: 08-01-2015 at 04:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People in pakistan boat were suspected terrorists rajnath singh