पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख परवेझ मुशर्रफ यांना गुरूवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, मुशर्रफ त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांबरोबर असताना त्यांना चक्कर आली. यानंतर त्यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत पीएनएस शिफा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांचे पथक मुशर्रफ यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. मुशर्रफ सध्या ७२ वर्षांचे असून यापूर्वीही अनेकदा त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी उद्भवल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2016 रोजी प्रकाशित
चक्कर आल्यामुळे परवेझ मुशर्रफ रूग्णालयात दाखल
सध्या डॉक्टरांचे पथक मुशर्रफ यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 11-02-2016 at 19:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pervez musharraf hospitalised after fainting at home