पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी जात असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे गुरुवारी ते तिसऱ्यांदाही न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
बुधवारी रात्रीपासूनच मुशर्रफ यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यावर औषधोपचार केले आणि त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता, असे मुशर्रफ यांच्या ‘एपीएमएल’ पक्षाच्या प्रवक्त्या आसिया इशाक यांनी सांगितले. दरम्यान, मुशर्रफ यांना उपचारांसाठी परदेशात हलविले जाण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2014 रोजी प्रकाशित
मुशर्रफ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका
पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना गुरुवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

First published on: 03-01-2014 at 12:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pervez musharraf suffers a severe heart attack