पेट्रोलचे दर कायमच भारतीयांच्या चिंतेचा विषय असतात. पेट्रोलचे दर वाढल्यास त्याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसते. दुचाकी किंवा कार असो वा नसो, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसतो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडते. त्यामुळे जर ५ वर्षांनंतर पेट्रोल ३० रुपये प्रति लिटर दराने खरेदी करता येईल, असे जर तुम्हाला आम्ही तुम्हाला सांगितले, तर तुम्हाचा आनंद गगनात मावेनासा होईल. मात्र यावर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न तुम्हाला पडेल. मात्र असे होणे शक्य आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदलांमुळे ५ वर्षांनंतर पेट्रोलचे दर प्रति लिटर ३० रुपये असू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे प्रख्यात भविष्यवेत्ते टोनी सीबा यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील येत्या काळातील बदल लक्षात घेऊन ५ वर्षांमध्ये पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात घसरतील, असा दावा केला आहे. ‘जगात सौरऊर्जेचा बोलबाला होईल,’ अशी भविष्यवाणी टोनी सीबा यांनी खूप आधीच केली होती. सीबा यांनी ज्यावेळी ही भविष्यवाणी केली, त्यावेळी सौरऊर्जेचे दर आताच्या दरांच्या तुलनेत १० पट जास्त होते. टोनी सीबा यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि सौरऊर्जेच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. आता जगभरात सौरऊर्जा पेट्रोलियम पदार्थांसाठी एक चांगला पर्याय ठरते आहे.

इंग्रजी संकेतस्थळ ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार टोनी सीबा सिलिकॉन व्ह्रॅलीतील एक मोठे व्यावसायिक आहेत. यासोबतच सीबा स्टॅनफोर्ड महाविद्यालयात अपारंपारिक ऊर्जेशी संबंधित विषयांचा अभ्यास करतात. ‘स्वयंचलित वाहनांमुळे जगभरातील पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये जबरदस्त घट होईल. त्यामुळे तेलाचे दर २५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरतील,’ असे टोनी सीबा यांनी म्हटले आहे.

पेट्रोलचे दर ३० रुपये किंवा त्यापेक्षाही खाली आल्यास भारतीयांना मोठा आनंद होईल. टोनी सीबा यांच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवणे कदाचित भारतीयांना कठीण जाईल. मात्र सीबा यांनी दिलेले तर्क आणि त्यांच्याकडे असणारी आकडेवारी यांच्यात तथ्य आहे. ‘२०२०-२१ मध्ये जगभरात तेलाची मागणी सर्वाधिक असेल. त्यामुळे तेलाचे दर १०० मिलियन प्रति बॅरलवर पोहोचतील. मात्र त्यानंतर तेलाचे दर घसरण्यास सुरुवात होईल. १० वर्षांमध्ये तेलाच्या मागणीत घट होईल. त्यामुळे तेलाचे दर ७० मिलियन प्रति बॅरलवर येतील. म्हणजेच जगभरात २५ डॉलर प्रति बॅरल दराने तेल उपलब्ध असेल,’ असे सीबा यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol could be below rs 30 a litre in 5 years predicts american futurist
First published on: 26-05-2017 at 08:52 IST