उत्तर प्रदेशसहीत पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. विशेष करुन उत्तर प्रदेशमधील महत्वाच्या शहरांमधील इंधनाचे दर निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे मागील बऱ्याच काळापासून या शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर होते.

सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशमधील नोएडा, लखनऊबरोबरच बिहारची राजधानी पटना आणि हरियाणामधील गुरुग्राम येथील पेट्रोल तसेच डिझेलच्या दरांमध्ये वाढ केलीय. मुख्य चार शहरांपैकी चेन्नई वगळता इतर तीन म्हणजेच दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यामध्ये इंधनाचे दर जैसे थे आहेत. या शहरांमधील इंधनाचे दर मागील चार महिन्यांपासून स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ११० रुपये इतका आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच शहरांमधील दर मुंबईप्रमाणे पूर्वीसारखेच आहेत.

Toronto airport cargo facility Heist
कॅनडामध्ये ‘मनी हाइस्ट’ प्रमाणे सर्वात मोठी चोरी; भारतीय वंशाच्या आरोपींनी ४०० किलो सोने पळविले
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

चार मुख्य शहरांमधील दर खालीलप्रमाणे
दिल्ली – पेट्रोल ९५.४१ रुपये प्रति लिटर, डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल १०९.९८ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०१.५१ रुपये प्रति लिटर, डिझेल ९१.५३ रुपये प्रति लिटर
कोलकत्ता – पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर

या शहरांमध्ये बदलण्यात आले दर
गुरुग्राम – पेट्रोल ९५.६८ रुपये प्रति लिटर, डिझेल ८६.९० रुपये प्रति लिटर
नोएडा – पेट्रोल ९५.६४ रुपये प्रति लिटर, डिझेल ८७.१४ रुपये प्रति लिटर
जयपूर – पेट्रोल १०७.०६ रुपये प्रति लिटर, डिझेल ९०.७० रुपये प्रति लिटर
लखनऊ- पेट्रोल ९५.२९ रुपये प्रति लिटर, डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर
पटना – पेट्रोल १०६.२६ रुपये प्रति लिटर, डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटर

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर
देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.