दर महिन्याला रेडिओवर सादर होणाऱ्या पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातील मुद्दय़ांवर शालेय विद्यार्थ्यांकडून लेख लिहून घेऊन त्यांना गौरविणाऱ्या कन्नूर आकाशवाणी केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
मोदींनी या आकाशवाणी केंद्राचा विशेष उल्लेख केला. केंद्राकडून श्रेधा थामबान विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आल्याची माहिती देण्यात आल्यावर मोदींनी या उपक्रमाचे कौतुक केले. ५ ऑक्टोबर रोजी आकाशवाणी केंद्राने श्राव्य पुरस्कार देऊन श्रेधाचा गौरव केला. केंद्राचे कार्यक्रम प्रमुख के. भालचंद्रन यांनी या हा पुरस्कार देऊन पंतप्रधानांचा कार्यक्रम लोकप्रिय करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.