बिहारमधील आरोग्य विभागाच्या करोना तपासणी यादीवर नजर टाकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी इतकच काय तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता अक्षय कुमार यांचीही करोना चाचणी अरवाल जिल्ह्यामध्ये झालीय.

खोट्या करोना चाचण्यांचा भांडाफोड बिहारमधील अरवाल जिल्ह्यात झालाय. या प्रकरणामध्ये खोटी नावं नोंदवून करोना चाचण्या करण्यात आल्यांचं दाखवण्यात आलं असून यात देशातील बड्या नेत्यांबरोबरच सिनेसृष्टीमधील बड्या व्यक्तींची नावंही आरटी-पीसीआर चाचण्यांच्या यादीमध्ये आहे. २७ ऑक्टोबर रोजी अरवाल जिल्ह्यातील कारपी ब्लॉकमध्ये या चाचण्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Coronavirus: ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच समोर आली दिलासादायक आकडेवारी; मागील दीड वर्षांमध्ये पहिल्यांदाच…

विशेष म्हणजे ज्या प्रसिद्ध व्यक्तींची नावं या यादीमध्ये आहेत ते बिहारचे नाहीत. तसेच ते कधी बिहारमध्ये वास्तव्यासही नव्हते. तरीही वेगवेगळ्या गावांमधील पत्ते या प्रसिद्ध नावांसमोर लिहिण्यात आले आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव या यादीमध्ये तिनदा आलं आहे. काँग्रेसचे बिहारमधील माजी पक्षप्रमुख राम जतन सिंन्हा यांच्या पूर्णा गावातील पत्ता मोदींच्या नावापुढे लिहिलेला आहे. तसेच प्रियांका चोप्रा हे नाव यादीमध्ये सहावेला आलं असून कारपी ब्लॉकमधील जोनहा गावाचा पत्ता तिच्या नावापुढे आहे.

नक्की पाहा हे फोटो >> ओमायक्रॉन: हिंसाचार, जाळपोळ अन्…; निर्बंधांच्या भितीने अनेक देशांमधील परिस्थिती चिघळली, पण WHO म्हणतंय…

अक्षय कुमारचं नाव चार वेळा तर अमित शाह यांच्या नावाचा उल्लेख या यादीमध्ये दोनदा करण्यात आलाय. उपलब्ध कागदपत्रांनुसार या नावाच्या व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल २७ ऑक्टोबर रोजी पुढील दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबरला आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी कलेक्ट करण्यात आल्याचं म्हटलंय. या चाचण्यांमध्ये कोणालाच करोना संसर्ग झालेला नसल्याचंही या यादीत दाखवण्यात आलंय.

राज्येचे आरोग्य निर्देशक संजय कुमार सिंह यांनी दोन डेटा ऑप्रेटर्सला कामावरुन काढून टाकण्यात आलं असून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिलीय. हा फसवणुकीचा प्रकार असून या नावांच्या आडून कोणाचे सॅम्पल गोळा करण्यात आलेले याचा तपास केला जाईल असं संजय यांनी म्हटलं आहे. डेटा ऑप्रेटर्सने या प्रकरणामध्ये आमच्यावर वरुन दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केलाय. मात्र वरिष्ठांनी हे आरोप फेटाळलेत.

नक्की वाचा >> चिंता वाढवणारी बातमी! देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित महाराष्ट्रात; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाप्रकारे बिहारमध्ये पहिल्यांदाच करोना चाचण्यांची खोटी नोंद झालेली नाही. यापूर्वी फेब्रुवारी माहिन्यामध्ये जामुईमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं.