ऊर्जा क्षेत्रात सार्वजनिक-खासगी सहभागाच्या प्रारूपाला पंतप्रधान अनुकूल

ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक-खासगी सहभागाच्या प्रारूपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुकूलता दर्शविली आहे.

ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक-खासगी सहभागाच्या प्रारूपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुकूलता दर्शविली आहे. देशातील ऊर्जेची वाढती गरज भागविण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोत हाच त्यावरील पर्याय आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
काश्मीरमधील बारामुल्ला येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी-२ या २४० मेगाव्ॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलविद्युत प्रकल्पासह अपारंपरिक ऊर्जा हा औष्णिक ऊर्जेला पर्याय म्हणून वेगाने विकसित होत आहे. या वेळी मोदी यांनी भूतानमधील ऊर्जाक्षेत्राचे उदाहरण दिले.
देशातील ऊर्जाक्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी सार्वजनिक-खासगी क्षेत्रातील सहभागाच्या प्रारूपाचेही या वेळी मोदी यांनी समर्थन केले. यूपीए सरकारने योग्य वेळी पारेषण वाहिन्यांचे काम हाती घेतले असते, तर आता परिस्थिती निराळी असती, असेही पंतप्रधान म्हणाले.
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोरा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मोदी यांनी हा प्रकल्प देशाला समर्पित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pm modi favours ppp model in power sector