पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल(मंगळवार) राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह दिले आणि त्यांनी मिळवलेल्या यशावर चर्चा केली. पंतप्रधानांनी मुलांशी अगदी मनमोकळेपणाने त्यांच्यात मिसळून संवाद साधला. यावेळी मुलांनीही पंतप्रधानांनी काही प्रश्न विचारेल, त्यांना वाटणाऱ्या आव्हानांवर मार्गदर्शन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी पंतप्रधान मोदींनी पुरस्कार विजेत्यांना सांगितले की, आयुष्यात पुढे जाण्यासाठी छोट्या अडचणींवर मात करत सुरूवात करा आणि हळूहळू क्षमता वाढवा. यानंतर मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करा. याशिवाय मानिसक आरोग्य आणि मुलांच्यासमोर येणाऱ्या समस्यांवर बोलताना पंतप्रधानांनी, या समस्या दूर करण्यासाठी कुटुंबाच्या असणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबतही सांगितले.

या विषयांवर झाली चर्चा –

या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक अन्य विषयांवरही मार्गदर्शन केले. ज्यामध्ये बुद्धीबळ खेळण्याचे फायदे, कला आणि संस्कृतीला करिअर म्हणून पाहणे, संशोधन, नाविन्य, आधात्मिकता इत्यादींची समावेश होता.

सहा श्रेणींमध्ये दिला जातो पुरस्कार –

भारत सरकारकडून मुलांना नवोन्मेष, समाजसेवा, शैक्षिणक, क्रीडा, कला, संस्कृती आणि शौर्य या सहा श्रेणींमध्ये त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो. प्रत्येक पुरस्कार विजेत्यास पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाते.

विजेत्यांची नावे –

या वर्षी बालशक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये देशभरातून ११ मुलांना पीएमआरबीपी-२०२३ साठी निवडले गेले आहे. ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पुरस्कार विजेत्यांमध्ये सहा मुले आणि पाच मुलींचा समावेश आहे. आदित्य सुरेश, एम. गौरवी रेड़्डी, श्रेया भट्टाचार्जी, संभव मिश्रा, रोहन रामचंद्र बहिर, आदित्य प्रताप सिंह चौहान, ऋषि शिव प्रसन्ना, अनुष्का जॉली, हनाया निसार, कोलागाटला अलाना मिनाक्षी आणि शौर्यजीत रणजीतकुमार खैरे. अशी पुरस्कार विजेत्यांची नावे आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi interacts with national children award winners guided the children msr
First published on: 25-01-2023 at 17:12 IST