पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची आज भेट घेतली. आज हिबेन या वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त मोदींनी आईची भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. हिराबा या नावानेही अनेकजण हिराबेन यांना ओळखतात. पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. मोदींनी या फोटोंना एक छान कॅप्शनही दिली आहे.

“आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे. या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हिराबा आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत असून ते आईशी हसून चर्चा करत आहेत. एका फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसतेय. तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
gadchiroli lok sabha seat, Minister dharamraobaba aatram, Claims, vijay waddetivar will join bjp, waddettiwar denies
विजय वडेट्टीवार यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश! धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्याने खळबळ
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार

पंतप्रधान मोदींनी शेअर केलेले हे फोटो अल्पावधीत व्हायरल झाले असून पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्यांना सव्वापाच हजारांहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलंय.

हेही वाचा – आजचा दिवस पंतप्रधान मोदींसाठी फारच खास… आईच्या पायाशी जाऊन बसले; फोटो शेअर करत म्हणाले, “आज मी…”

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकालानंतर याच वर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास हिराबा यांची त्यांच्या अहमदाबाद इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान त्यांनी ही भेट घेतली होती. करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पंतप्रधान त्यांच्या आईला भेटले नव्हते. मार्च महिन्यातील ही भेट दोन वर्षांमधील पहिलीच भेट ठरली.

आणखी वाचा – “आई-वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर अनिवार्य आहे का?”; मोदींच्या आईच्या वाढदिवशीच महाराष्ट्रातील नेत्याचा प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या गांधीनगरजवळच्या रायसन भागातील निवासस्थाला भेट दिली होती. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबा या सध्या इथंच राहत आहेत. रात्री नऊच्या सुमारास पंतप्रधान मोदी आपली सर्व कामं संपवून घरी गेले. त्यावेळी मोदी यांनी आपल्या आईचे आशिर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं होतं.