पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये झालेल्या अपघातानंतर आता ओडिशाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशातल्या बालासोरमध्ये तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. या अपघातात २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला. ९०० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. यानंतर आता मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशा अपघातासंदर्भात बैठक घेतली. आता त्यांनी ओडिशाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात स्थळी ते जाणार आहेत तसंच जखमींची विचारपूसही करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ANI ने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कटकला जाणार आहेत. तिथे ते ओडिशा अपघातातल्या जखमींची भेट घेणार आहेत आणि त्यांची विचारपूस करणार आहेत. ओडिशा या ठिकाणी तीन ट्रेन्सचा शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर कटकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Elon musk and narendra modi
टेस्लाची भारतातील गुंतवणूक लांबली, एलॉन मस्क यांनी दौरा पुढे ढकलला! नव्या दौऱ्याबाबत दिले संकेत
Coco island and Pandit Neharu
Loksabha Election 2024: भाजपाचा दावा किती खरा, किती खोटा? पंतप्रधान नेहरूंच्या निर्णयामुळेच भारताने गमावला का कोको बेटांवरील हक्क?
Prime Minister Modi criticism in Kanhan meeting that India is anti development
‘इंडिया’ विकासविरोधी! कन्हानच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र
Arvind Kejariwal Rape Accusations Of IIT Students
अरविंद केजरीवालांवर बलात्काराचा आरोप? प्रसिद्ध वृत्तपत्राचे कात्रण चर्चेत, अटकेचं खरं कारण काय?

शुक्रवारी रात्रीपासूनच मदत आणि बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.

अपघात कसा झाला?

कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असंही रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलं आहे. हावडा मेलची ही टक्कर या दरम्यान झाली. एनडीआरएफ आणि लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.