पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सैनिकांच्या पराक्रमाचं कौतुक केलं. “प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आठवण येते,” अशी भावना मोदींनी व्यक्त केली. तसेच जेथे सैनिक तेथेच माझा सण असंही नमूद केलं. ते रविवारी (१२ नोव्हेंबर) हिमाचल प्रदेशमधील लेपचा येथे सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करताना बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा हा उद्घोष आहे. दिवाळी हा पृथ्वीवरील पवित्र सण आहे. हा फार मोठा योगायोग आहे. माझ्यासाठी हा क्षण समाधान आणि आनंद देणारा आहे. हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि देशवासीयांना दिवाळीचा नवा प्रकाश देईल, असा मला विश्वास आहे.”

“संपूर्ण देश सैनिकांबद्दल कृतज्ञ”

“कुटुंबाची आठवण प्रत्येकाला येते. मात्र, भारतीय सैनिकांच्या चेहऱ्यावर अजिबात उदासपणा जाणवत नाही. सैनिकांच्या उत्साहात अजिबात कमतरता दिसत नाही. तुमच्यात उत्साह आणि उर्जा भरलेली आहे. कारण तुम्हाला १४० कोटी जनतेचं कुटुंब तुमचंच आहे हे माहिती आहे. संपूर्ण देश यासाठी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो,” असं मत नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “आपल्या प्रिय पंतप्रधान मोदींना कुणीतरी हे सांगितलं पाहिजे की…”; जातीयवादाचा आरोप करत संजय राऊतांचा हल्लाबोल

“जेथे सैनिक, तेथे माझा सण”

“माझ्यासाठी जेथे भारताचे सैनिक तैनात आहेत ती जागा कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. जेथे सैनिक, तेथे माझा सण आहे. आपल्या सैनिकांकडे या वीर वसुंधरेचा वारसा कायम राहिला आहे. त्यामुळेच सैनिकांनी अनेक पराक्रम केलं. आपल्या जीवाची पर्वा न करता सैनिक कायम देशरक्षणासाठी पुढे जात राहिले. आपल्या सैनिकांनी हे कायम सिद्ध केलंय की, सीमेवर सैनिक देशाची सर्वात मजबूत भिंत आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi celebrate diwali with indian soldiers in himachal pradesh pbs
First published on: 12-11-2023 at 16:48 IST