पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. शेरोशायरीचा वापर करत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. जेवढा चिखल उडवाल तेवढं कमळ फुलेल, असं म्हणत मोदींना विरोधकांना टोला लगावला. यावेळी मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांचा उल्लेख करत गांधी परिवारावरही शाब्दिक हल्ला चढवला.

नरेंद्र मोदी म्हणाले, “अशाप्रकारची वृत्ती असणाऱ्यांना मी इतकंच सांगेन की, ‘किचड उसके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था उसने दिया उछाल…’. तुम्ही जितका चिखल उडवाल तेवढं कमळ फुलेल. त्यामुळे कमळ फुलवण्यात विरोधकांचं जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान आहे त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो.”

व्हिडीओ पाहा :

“विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, आम्ही ६० वर्षात भक्कम पाया बनवला. आता त्यांची तक्रार होती की, पाया आम्ही तयार केला आणि श्रेय मोदी घेत आहे. मात्र, २०१४ मध्ये सत्तेत आल्यावर मी गोष्टी बारकाईने पाहिल्या. तेव्हा लक्षात आलं की, ६० वर्षे काँग्रेस परिवाराने केवळ खड्डेच खड्डे निर्माण केले होते,” असा आरोप नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबावर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “…तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका”, प्रविण तोगडीयांचं मोठं विधान, म्हणाले, “मोदी-शाहांनी…”

“गांधी परिवाराचा हेतू चांगलाही असेल. मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये. मात्र, त्यांनी खड्डेच खड्डे निर्माण केले,” असंही मोदींनी नमूद केलं.