लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज (१४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुद्रा योजनेच्या कर्जाची मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढवली, देशात नव्या बुलेट ट्रेन येणार, गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे, पीएम सूर्य घर योजना, लखपती दीदी योजना, नारी शक्तीचे सशक्तिककरण यासह आदी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणते मुद्दे?

शेतकऱ्यांचा सन्मान, ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, नारी शक्तीचे सशक्तिककरण, लहान व्यापारी आणि बांधकाम मजूरांचे सशक्तिककरण, ३ कोटी लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब, सुरक्षित, समृद्ध भारत, ऑलिम्पिकचे यजमानपद, शिक्षण, यासह आदी महत्वाचे मुद्दे भाजपाच्या जाहीरनाम्यात आहेत.

हेही वाचा : गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

भाजपाने कोणत्या मोठ्या घोषणा केल्या?

पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाणार, जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार, उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षांपर्यंत वाढविण्यात येणार, महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार, कोट्यवधी लोकांची वीजबील शून्य करण्यावर भर देण्यात येणार, कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार,महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार, ३ कोटी महिलांना लखपती करणार, मुद्रा योजना १० लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढविण्यात येणार, नवी बुलेट ट्रेन उत्तर, दक्षिण पुर्व भारतात आणणार, वंदे भारतचे स्लीपर, चेअर, मेट्रो असे तीन प्रकार करण्यात येणार, मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार, अशा मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.

गरिबांना परवडणारे पौष्टिक अन्न दिले जाणारे, ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेचा लाभ, ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार, मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार, गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार, तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचवणार, पीएम किसान योजनेचा लाभ पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार, देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्या वाढवण्यात येणार, ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब निर्माण करणार, अशा घोषणा भाजपाकडून करण्यात आल्या आहेत.