PM Narendra Modi to Address Nation: घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. उद्यापासून जीएसटीमध्ये केलेल्या नव्या सुधारणा लागू होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज संवाद साधला. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने या महिन्याच्या सुरुवातीला ५६ व्या बैठकीत आठ वर्ष जुन्या अप्रत्यक्ष कर रचनेत महत्त्वाच्या सुधारणांना मंजुरी दिली. यापुढे ५ आणि १८ टक्के अशा द्वीस्तरीय कर रचनेचा मार्ग मोकळा झाला. या नव्या बदलामुळे सामान्य माणूस, शेतकरी, छोटे व्यापारी, महिला आणि युवकांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले गेले.

पंतप्रधान मोदींनी शेवटचे संबोधन कधी केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी १२ मे २०२५ रोजी शेवटचे देशाला संबोधित केले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती त्यांनी या संबोधनातून दिली होती.

यापूर्वी देशाला किती वेळा संबोधित केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला केलेले संबोधन याआधीही चर्चेत राहिले होते. विशेषतः नोटाबंदी आधी त्यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केलेले संबोधन ऐतिहासिक ठरले होते. त्यानंतर १२ मार्च २०१९ रोजी त्यांनी बालाकोट एअरस्ट्राईकची माहिती दिली होती.

तसेच २४ मार्च २०२० रोजी त्यांनी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करत असताना देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यानंतर १४ एप्रिल २०२० रोजी पुन्हा एकदा लाईव्ह येत लॉकडाऊनची मुदत वाढवली होती.

Live Updates

PM Narendra Modi To Address Nation Today Live Updates

17:28 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: GST सुधारणा, कर कपात यामुळं मध्यम वर्गाची अडीच लाख कोटींची बचत होणार - पंतप्रधान मोदी

जीएसटीमध्ये सुधारणा करून अनेक जीवनाश्यक वस्तू आता ५ आणि १२ टक्क्यांच्या करात बसवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मध्यम वर्गाची खरेदी सुखकर होणार आहेच. त्याशिवाय १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केल्यामुळे मध्यम वर्गाची अडीच लाख कोटींची बचत होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

17:20 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: 'मेड इन इंडिया' असलेले सामान विकत घ्या - पंतप्रधान मोदी

आपल्याला मेड इन इंडिया असलेले सामान विकत घ्यायचे आहे. आम्ही स्वदेशी सामान विकत घेतो, हे गर्वाने सांगा. आम्ही स्वदेशी उत्पादन घेतो, हेही अभिमानाने सांगा. प्रत्येक भारतीयाने याचा गर्व बाळगला पाहिजे. जेव्हा सर्व हे पाळतील तेव्हा भारताचा वेगाने विकास होईल.

17:19 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: भारताचा गौरव पुन्हा प्राप्त करायचा आहे - पंतप्रधान मोदी

भारतातील लघुउद्योग एकेकाळी भारताची ओळख होता. आपल्याला हा गौरव पुन्हा एकदा प्राप्त करायचा आहे. आपले लघुउद्योग जे उत्पादन घेतील, त्याचा दर्जा जगात नावाजला जाईल, असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. देशाच्या स्वातंत्र्यात ज्याप्रमाणे स्वदेशीचा नारा गाजला. त्याप्रमाणे देशाच्या समृद्धीतही हाच नारा गाजायला हवा.

17:17 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी आत्मनिर्भर व्हावं लागेल - पंतप्रधान मोदी

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल. याची मोठी जबाबादरी MSME क्षेत्रावर आहे. जे लोकांना हवे आहे, त्याचे उत्पादन देशातच घेतले पाहिजे. जीएसटी कमी केल्यामुळे आणि नियमात शिथिलता आणल्यामुळे आपल्या देशातील छोट्या उद्योगांना मोठा लाभ होणार आहे. विक्री जास्त आणि कर कमी होणार असल्यामुळे छोट्या व्यापारांनाही मोठा फायदा होणार आहे.

17:14 (IST) 21 Sep 2025
PM Modi Speech Today Live Updates: व्यापारीही जीएसटीच्या सुधारणांमुळे खूश आहेत - पंतप्रधान मोदी

जीएसटीमध्ये सुधारणा केल्यामुळे आता अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. ५ आणि १८ टक्के हे दोनच कर असणार आहेत. यात सामान्यांना लागणाऱ्या ९९ टक्के जीवनाश्यक वस्तू मोडणार आहेत. यामुळे दुकानदारही आनंदीत झाले आहेत.

17:12 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: मागच्या ११ वर्षात देशातील २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले - पंतप्रधान मोदी

मागच्या ११ वर्षांत २५ कोटी लोकांनी गरीबीला हरवले असून ते गरीबीतून बाहेर येत मध्यम वर्गात आले आहेत. त्यांच्या काही महत्त्वकांक्षा आहेत. यामुळे केंद्र सरकारने यावेळी १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केला. जीएसटीमध्ये सुधारणा करून आम्ही मध्यम वर्गाला दुप्पट लाभ दिला आहे.

17:08 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: २०१७ साली भारताने जीएसटी लागू करून नवा इतिहास रचला

भारतात अनेक दशकांपासून भारतातील सामान्य माणूस, व्यापारी वेगवेगळ्या करांच्या जाळ्यात अडकले होते. त्या सर्वांची आपण जीएसटी हा एकच कर लावून मुक्तता केली.

17:03 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देशात बचत उत्सव सुरू होणार

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुर्योदयाबरोबर जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होतील. उद्यापासून जीएसटी बचत उत्सव सुरू होत आहे. या उत्सवामुळे तुमची बचत वाढेल. तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू विकत घेऊ शकाल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

15:59 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

पंतप्रधान मोदी आज ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४२ व्यांदा भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबविल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी आजच्या भाषणात त्यांना सडेतोड उत्तर देणार का? असा सवाल काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.

https://twitter.com/Jairam_Ramesh/status/1969675319742513559

15:02 (IST) 21 Sep 2025

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारताच्या सीमेवरील शेवटचं गाव ठरलं पहिलं? हे कसं घडलं?

PM Narendra Modi 75th Birthday: हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे ३,२२० मीटर उंचीवर वसलेलं असून, चीन-तिबेट सीमेपासून फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे. धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या स्थानाला मोठं महत्त्व आहे. ...अधिक वाचा
14:33 (IST) 21 Sep 2025

"या जगात भारताचा केवळ एकच शत्रू…", पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य

Narendra Modi at Bhavnagar Gujarat : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारत आज विश्वबंधूच्या भावनेने मार्गक्रमण करत पुढे जात आहे. या जगात आपला कोणीही मोठा शत्रू नाही. परंतु, भारताने इतर देशांवरील अवलंबित्व कमी करणं गरजेचं आहे." ...अधिक वाचा
14:20 (IST) 21 Sep 2025

Nirmala Sitharaman: ‘जीएसटी सुधारणा हा भारतीयांचा विजय’

केंद्र सरकारकडून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा करातील (जीएसटी) सुधारणा या प्रत्येक भारतीयासाठी मोठ्या विजयाची बाब ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी व्यक्त केला. ...सविस्तर वाचा
13:12 (IST) 21 Sep 2025

जीएसटी कपातीचे ‘बाजार’ भरभराटीचे अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत, कारणे काय?

भाषणाबरहुकूम लगोलग पाऊल टाकत, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून वस्तू-सेवा कर अर्थात जीएसटीच्या दरात सुधारणांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...अधिक वाचा
12:56 (IST) 21 Sep 2025

जीएसटी कपातीनंतर औषधे नेमकी किती स्वस्त होणार? जाणून घ्या किमतीतील बदल…

सरकारच्या नव्या जीएसटी निर्णयामुळे कर्करोग व दुर्मीळ आजारांवरील औषधे करमुक्त; विक्रेते २२ सप्टेंबरपासून स्वस्त दराने विक्री करणार. ...अधिक वाचा
12:33 (IST) 21 Sep 2025

Narendra Modi: परावलंबन देशाचा सर्वात मोठा शत्रू स्वावलंबन हाच उपाय : पंतप्रधान

इतर देशांवरील अवलंबित्व हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. गुजरातमधील भावनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी स्वावलंबनावर भर दिला. ...वाचा सविस्तर
12:30 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: उद्यापासून जीएसटी २.० ची सुरुवात

२२ सप्टेंबर पासून जीएसटी कराची नवी दर रचना लागू होत आहे. पुढल्या पिढीतील जीएसटी सुधारणांनंतर, १२ टक्के दर टप्प्यातील ९९ टक्के वस्तू पाच टक्के दरांच्या श्रेणीत आल्या आहेत. तसेच नवीन फेरबदलांमुळे २८ टक्के कर टप्प्यात मोडणाऱ्या ९० टक्के वस्तूंचा १८ टक्के दर श्रेणीत समावेश झाला आहे.

12:24 (IST) 21 Sep 2025

PM Modi Speech Today Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या विषयावर बोलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ते कोणत्या विषयावर बोलणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

India cannot depend on foreign powers for future developments says Narendra Modi

Narendra Modi: परावलंबन देशाचा सर्वात मोठा शत्रू स्वावलंबन हाच उपाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता