PM Narendra Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. तसेच ते ‘क्वाड’ राष्ट्रांच्या वार्षिक शिखर परिषदेतही सहभागी झाले आहेत. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांशी संवाद साधला आहे. “आता आपलं नमस्ते देखील लोकलमधून ग्लोबल झालं आहे”, असं म्हणत अमेरिकेतील भारतीयांचं त्यांनी कौतुक केलं आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“नमस्ते अमेरिका. आता आपला नमस्ते देखील ग्लोबल झाला आहे. प्रत्येक भारतीयांमुळे हे शक्य झालं. खरं तर विदेशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांना मी राष्ट्रदूत मानतो. अमेरिकेतील भारतीयांनी खूप मोठी मजल मारली आहे. भारतीयांमुळे अमेरिकेत आपल्या देशाची प्रतिमा अधिक चांगली बनली आहे. मी प्रत्येकवेळी अमेरिकेत आल्यानंतर तुम्ही सर्वजण पाठिमागचं रेकॉर्ड मोडतात. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आहात. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना राष्ट्रदूत मानतो. तुम्ही सर्वांनी भारत अमेरिकेला आणि अमेरिका भारताला जोडून ठेवण्याचं काम केलं आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : PM Modi US Visit : “माझ्या आईचं घर तुमच्या गाडी एवढंच”, मोदींचं बोलणं ऐकून ओबामांना बसला होता आश्चर्याचा धक्का

“तुमचं सर्वांचं ज्ञान, तुमची सर्वांची मेहनत आणि तुमची जिद्द याचा कोणीही सामना करू शकत नाही. भारतीयांच्या कौशल्याला जगभरात तोड नाही. तुम्ही साता समुद्राच्या पार आले आहात. पण कोणताही समुद्र असा नाही की जो तुमच्यापासून आम्हाला दूर करू शकेल. भारतमातेने जे आपल्याला शिकवलं ते आपण कधीही विसरू शकत नाहीत. आपण ज्या देशातून आलो आहोत त्या देशात शेकडो भाषा बोलल्या जातात. अमेरिकेतही अनेक भाषा बोलणारे भारतीय राहतात. मात्र, तरीही आपण एकत्र मिळून पुढे जात आहोत. यामध्ये जमलेल्या लोकांमध्ये कोणी तमिळ भाषा बोलत असेल, कोणी कन्नडी, कोणी मराठी, कोणी गुजराती बोलत असेल, वेगवेगळी भाषा असली तरी सर्वांचा एकच भाव आहे तो म्हणजे भारतीयता”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एआय म्हणजे अमेरिका आणि इंडिया’

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “जगाच्या बरोबर जोडण्यासाठी आपली भारतीयता ही सर्वात मोठी ताकद आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचं योगदान जगाने पाहिलं. जगासाठी ‘एआय’चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मात्र, मी असं मानतो की, ‘एआय’ म्हणजे अमेरिका आणि इंडिया. अमेरिका भारत एक आत्मा आहे. हा एआय आत्मा भारत आणि अमेरिका संबंधांना नवीन उंची देत ​​आहे. हेच एआय भारत आणि अमेरिकेला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी महत्वाचा ठरेल”, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.