पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा कपड्यांमुळे कायम चर्चेत असतात. यापूर्वी त्यांचा ‘नरेंद्र मोदी’ लिहिलेला एक सूट चांगलाच चर्चेचा विषय बनला होता. दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी संसदेत दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींच्या निळ्या रंगाच्या जाकीटचीही जोरदार चर्चा बघायला मिळाली. त्याचं कारण म्हणजे हे जाकीट कोणत्या ब्रँडने बनवलेलं नसून प्लास्टीकपासून बनवण्यात आलं आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदी हे जाकीट घातल्याचं सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग हटवणार आणि कलिंगडावर बंदी घालणार का? ओवैसींचा संसदेत सवाल

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी आज घातलेलं निळ्या रंगाचे सद्री जाकीट हे प्लॅस्टिक बाटल्यांच्या पुनर्वापरून तयार केलं आहे. सोमवारी बंगळुरू येथे पार पडलेल्या इंडिया एनर्जी वीकच्या उद्घाटनावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने त्यांना हा जाकीट भेट म्हणून दिले होते. तसेच अर्जेंटाइन ऊर्जा कंपनीचे पाब्लो गोन्झालेझ यांनी अर्जेंटिना फुटबॉल संघाचा खेळाडून मेस्सीचा सही असलेली जर्सीही भेट दिली होती.

हेही वाचा – “हिंडेनबर्ग भारतात असतं तर UAPA लागला असता” असदुद्दीन ओवैसी यांचं लोकसभेत टीकास्त्र

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी घातलेलं जाकीट इंडियन ऑइलने PET बॉटल्सपासून तयार केलं असून यासाठी साधारण १५ प्लास्टिक बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच इंडियन ऑइल कंपनीने हे जाकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील टेलरकडून शिवून घेतल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi wears blue jacket made by recycled plastic bottles spb
First published on: 08-02-2023 at 15:18 IST