PM Narendra Modi Will Flag off MV Ganga Vilas : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूझ पुढच्या प्रवासाला रवाना झाली आहे. या क्रूझमध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजसह फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. मात्र, त्यासाठी प्रवाशांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

हेही वाचा – बार, स्पा अन् रेस्टॉरंट; जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ आतून कशी आहे? पाहा PHOTOS

‘एमव्ही गंगा विलास’ची वैशिष्ट्ये

‘एमव्ही गंगा विलास’ ही क्रूझ ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद आहे. तसेच या क्रूझमध्ये ४० हजार लिटरची इंधन टाकी आणि ६० हजार लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. ही क्रूझ नदीतून १० ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करणार आहे. तसेच या क्रूझ सेवेसाठी ६८ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचीही माहिती आहे.

क्रूझमध्ये मिळणार ‘या’ सुविधा

‘एमव्ही गंगा विलास’ क्रूझमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे. तसेच तीन डेक आणि ३६ प्रवासी राहू शकतील असे १८ सूट आहेत. मेन डेकवरील ४० सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे. तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे. याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे.

‘या’ मार्गावरून करणार प्रवास

१३ जानेवारी रोजी वाराणसीवरून निघालेली ही क्रूझ ५१ दिवस प्रवास करून १ मार्च रोजी आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान ती गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून तसेच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यातून प्रवास करणार आहे. पुढे ती बांगलादेशमध्येसुद्धा प्रवेश करणार आहे. या प्रवासादरम्यान वाराणसी, पाटणा, कोलकाता, ढाका, गुवाहाटी, डिब्रुगढ यासह ५० पेक्षा जास्त पर्यटन स्थळावरही ही क्रूझ थांबा घेणार आहे.

हेही वाचा – Bomb call on Delhi-Pune Spicejet flight : दिल्लाहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या फोनमुळे खळबळ!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांना मोजावी लागणार मोठी रक्कम

दरम्यान, या प्रवासाठी प्रवाशांना एका दिवसासाठी तब्बल ५० हजार रुपये मोजावे लागणार आहे. विशेष म्हणजे ही क्रूझ आगामी दोन वर्षांसाठी बूक झाली असून प्रवाशांनी बुकींग रद्द केले, तरच वेटींग लिस्टमधील प्रवाशांना तिकीट मिळेल, अशी माहिती अंतारा रिव्हर क्रूझचे मुख्यकार्यकारी अधिकारी राज सिंग यांनी दिली आहे.