scorecardresearch

Bomb call on Delhi-Pune Spicejet flight : दिल्लाहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या फोनमुळे खळबळ!

सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलीस हायअलर्टवर; विमानतळावर कसून तपासणी

Bomb call on Delhi-Pune Spicejet flight : दिल्लाहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या फोनमुळे खळबळ!
(संग्रहित छायाचित्र)

Bomb call on Delhi-Pune Spicejet flight : दिल्लीहून पुणे येथे जाणाऱ्या स्पाइसजेट कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती एका फोन कॉलद्वारे मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आणि दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर पुण्याला जाणाऱ्या प्रत्येक स्पाइसजेट विमानाची कसून तपासणी केली जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांयकाळी जवळपास साडेसहा वाजता एक धमकीचा फोन कॉल आला होता, ज्यानंतर विमानामधील प्रवाशांना तत्काळ बाहेर काढण्यात आलं.

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, हा फोन कॉल बनावट असल्याचे दिसत आहे, मात्र सुरक्षा यंत्रणा विमानाची कसून तपासणीी करत आहेत. विमानामधून अद्यापर्यंत तरी काहीच हस्तगत झालेले नाही. याशिवाय असेही सांगण्यात आले की, सीआयएसएफ बरोबर एक बैठक घेतली जात आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 21:23 IST

संबंधित बातम्या