पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १०.३० वाजता जगातील सर्वात लांब अंतराच्या नदीतील क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ला हा हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वाराणसीच्या रामनगर बंदरावरून ही क्रूझ प्रवासाला सुरूवात करेल. तसेच वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावरील ‘टेंट सिटी’चे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा – बार, स्पा अन् रेस्टॉरंट; जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ आतून कशी आहे? पाहा PHOTOS

‘ही’ आहेत क्रूझची वैशिष्टे

‘एमव्ही गंगा विलास’ही क्रूझ ५१ दिवसांत ३२ प्रवाशांसह वाराणसीहून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत तीन हजार २०० किमीचा प्रवास करणार आहे. या क्रूझमध्ये ५ स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, सनडेक, जिम, बार, स्पा आणि लाउंजचा समावेश आहे.तसेच मेन डेकवरील ४० सीटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय खाद्यपदार्थांसह बुफे काउंटर आहे. तर वरच्या डेकच्या बाहेर स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबल ठेवण्यात आले आहे. याबरोबच एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म, लाइफ वेस्ट आणि स्प्रिंकलर असलेली बाथरूम देखील या क्रूझमध्ये बनवण्यात आली आहे.

हेही वाचा – जगासमोरील संकटांना विकसनशील देशांनी एकजुटीने सामोरे जावे : मोदी‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ’ परिषदेतील संबोधन

१ मार्चला आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता

‘एमव्ही गंगा विलास’ ही क्रूझ ६२.५ मीटर लांब आणि १२.८ मीटर रुंद आहे. तसेच या क्रूझमध्ये ४० हजार लिटरची इंधन टाकी आणि ६० हजार लिटरची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. ही क्रूझ नदीतून १० ते १२ किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करेन. १३ जानेवारी रोजी वाराणसीवरून निघालेली ही क्रूझ १ मार्च रोजी आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान ती गंगा, हुगळी, विद्यावती, भागीरथी, मातला, पद्मा, जमुना आणि ब्रह्मपुत्रा या नदीतून प्रवास करणार आहे.

हेही वाचा- आनंदाची बातमी : महागाईचा दिलासा कायम, डिसेंबरमध्ये ५.७२ टक्क्यांच्या दरासह वर्षातील नीचांक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याबाबत बोलताना ५१ दिवसांची ही जलयात्रा देशाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याची व त्याच्या विविधतेच्या सुंदर पैलूंचा शोध लावण्याची अद्वितीय संधी देईल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.