GST 2.0 : देशभरात आजपासून (२२ सप्टेंबर) जीएसटीचे नवे दर लागू झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चार स्लॅब असणार आहेत. ० टक्के, ५ टक्के, १८ टक्के आणि ४० टक्के. यापैकी मुख्य जीएसटी हा ५ टक्के आणि १८ टक्केच असणार आहे. मात्र मद्य, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, सट्टा, ऑनलाइन गेमिंग अशा सिन गुड्सवर ४० टक्के जीएसटी लागू होणार आहे. नव्या जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना उद्देशून पत्र लिहिलं आहे.
काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पत्र?
माझ्या प्रिय बांधवांनो,
जीएसटी बचत उत्सव हा सणासुदीच्या काळात आला आहे. त्यामुळे नवा उत्साह, नवा जोश आता पाहण्यास मिळेल. तुम्ही हा उत्सव साजरा कराल यात शंका नाही. जीएसटीच्या नव्या दरांचा अर्थ प्रत्येक घरात आणखी बचत, तसंच व्यापाराच्या संधी आणि व्यापाऱ्यांना दिलासाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शक्तीच्या उपसाना पर्वाच्या आणि नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. माझी ही प्रार्थना आहे की हा उत्सव आणि येणाऱ्या काळातले सण उत्सव हे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता जीएसटीचे फक्त दोनच स्लॅब असतील. ५ टक्के आणि १८ टक्के. मला हे पाहूनही आनंद झाला की अनेक दुकानदारांनी वस्तूंचे दर आधी किती होते आणि आता किती झाले आहेत याचे फलक लावले आहेत. लोकांना हे दुकानदार, व्यावसायिक माहिती देत आहेत की कुठली वस्तू किती स्वस्त झाली?
आपल्या देशातले गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, दुकानदार, महिला, उद्योजक या सगळ्यांना बचत उत्सवाचा फायदा होणार आहे. सणवार सुरु होत आहेत आणि सगळ्यांचा उत्सव गोड होणार आहे. मी देशातल्या कोटी कोटी परिवारांना जीएसटी सुधारणा आणि बचत उत्सवाच्या शुभेच्छा देतो. जीएसटी सुधारणा या भारतात सुबत्ता आणतील. प्रत्येक राज्याला विकासाचा साथीदार होता येणार आहेत.
२०१७ मध्ये भारताने जीएसटी रिफॉर्मच्या दृष्टीने पावलं उचलली तेव्हा जुना इतिहास बदलून नवा रचण्याची तयारी सुरु झाली होती. आपण सगळे असो किंवा देशातले व्यापारी विविध करांमध्ये अडकलो होतो. ऑक्ट्रॉय, सेवा कर, अमुक कर असे अनेक कर होते. एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पाठवायचा असेल तर अनेक चेक पोस्ट पार करावी लागत. प्रत्येक ठिकाणी करांचे नियम वेगळे होते. मात्र आपण सगळ्या गोष्टींसाठी एकाच कराच्या अंतर्गत आणल्या. जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होत आहेत. ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब आता आहेत. त्यामुळे रोजच्या वापरातील गोष्टी आणखी स्वस्त होती. खाणं, पिणं, ब्रश, पेस्ट, साबण या आणि अशा अनेक वस्तू किंवा सेवा या टॅक्स फ्री होतील किंवा ५ टक्केच कर द्यावा लागेल. १२ टक्के कर ज्या गोष्टींवर होता त्यापैकी ९९ टक्के गोष्टी आपण ५ टक्के जीएसटीच्या कक्षेत घेतल्या आहेत असंही मोदींनी या पत्रात लिहिलं आहे.