CBSE Board 10th 12th Results 2025 Declared : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत या वर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.६६ टक्के आहे . गेल्या वर्षी ९३.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर बारावीच्या परीक्षेत यंदा एकूण ८८.३९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ०.४१ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास पोस्ट केली आहे.

सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. जिद्द, शिस्त आणि मेहनतीचे हे फळ आहे. पालक, शिक्षक आणि तुमच्या यशात सहभागी असलेल्या प्रत्येकाची आज दखल घेण्याचा दिवस आहे. तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानात तुम्हाला यश मिळो, याच तुम्हाला सदिच्छा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“या परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवत नसते. तुमचं आयुष्य यापेक्षा मोठं आहे आणि गुणपत्रिकेच्या पलिकडे तुमचं ताकद आहे. आत्मविश्वासू राहा, उत्सुक राहा. कारण चांगल्या गोष्टी तुमची वाट पाहतंय”, असंही ते पुढे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठे चेक कराल निकाल?

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई इयत्ता १२ वीचा निकाल २०२५ ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल डाउनलोड करण्यासाठी त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करावा लागेल. विद्यार्थी त्यांचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक तपासू शकतात.अधिकृत वेबसाइटवर तुमचे निकाल तपासा https://cbseresults.nic.in/

महाराष्ट्र CBSC बोर्डाचा १२ वीचा निकाल काय?

  • सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ८८.३९ टक्के
  • मागील वर्षीच्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी निकालात वाढ
  • सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा महाराष्ट्र विभागाचा निकाल ९०.९३%
  • महाराष्ट्र मध्ये ८८.८९% मुले उत्तीर्ण तर मुलींचा निकाल ९२.७५%

डिजीलॉकरवर कसा बघायचा बारावीचा निकाल?

  • ‘डिजिलॉकर’ अ‍ॅप डाउनलोड करा
  • digiLocker.gov.in वर जा.
  • तुमचा रोल नंबर, वर्ग, शाळेचा कोड आणि ६ अंकी पिन (शाळेने दिलेल्या माहितीनुसार) टाका.
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल तो भरा.
  • तुम्हाला तुमची मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.