जामनगरमधील भाजपच्या खासदार पूनमबेन माडाम सोमवारी सकाळी अतिक्रमणांची पाहणी करत असताना एका नाल्यामध्ये पडून जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पूनमबेन अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सकाळी जामनगरमधील अतिक्रमणांची पाहणी करीत होत्या. त्यावेळी एका नाल्यावर उभारलेल्या तात्पुरत्या झाकणावरून त्यांचा पाय घसरला आणि त्या सुमारे ७ फूट खोल नाल्यामध्ये कोसळल्या. त्यांच्यासोबत २-३ कार्यकर्तेही नाल्यामध्ये पडले. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने पूनमबेन यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेले. पूनमबेन यांच्या डोक्याला मार लागला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पूनमबेन माडाम २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जामनगर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी गुजरात विधानसभेत जामनगर जिल्ह्यातील खंभालिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonamben madam injured in an accident in jamnagar
First published on: 16-05-2016 at 12:59 IST