देशातील आफ्रिकी नागरिकांवर होत असलेले हल्ले व त्यांचे वाढत चाललेले प्रमाण हे सारेच चिंताजनक असून त्यामुळे आफ्रिकी देशांशी असलेल्या संबंधांमध्ये कटुता आल्यास फार मोठे दुर्दैव असेल, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आफ्रिकी नागरिकांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. दिल्लीत अलीकडेच एका आफ्रिकी नागरिकाची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर देशात इतरत्रही आफ्रिकी नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.  राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींनी या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली.