scorecardresearch

हुंडाबळी; तीन बहिणींसह दोन लहान मुलांचा मृतदेह आढळला विहिरीत, २७ दिवसाच्या बाळाचीही हत्या

ममता देवी आणि कमलेश या दोघी गरोदर होत्या आणि कालू देवींना जेमतेम महिनाभरापूर्वीच बाळ झाले होते.

फाईल फोटो

जयपूर जिल्ह्यातील दुडू शहरातील एका विहिरीत शनिवारी तीन महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडल्याची घटना घडली. कालू देवी(वय २७), ममता (वय २३) आणि कमलेश (वय २०) अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत. तर कालू देवी यांचे चार वर्षाचे एक मूल आणि केवळ २७ दिवसांचे बाळचा मृतहेदही विहिरीत आढळून आला आहे. हुंड्यासाठी या तिघींच्या सासरच्यांनी यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दोघी होत्या गरोदर

ममता देवी आणि कमलेश या दोघी गरोदर होत्या आणि कालू देवींना जेमतेम महिनाभरापूर्वीच बाळ झाले होते. या तिघी बहिणींचे लग्न ज्या व्यक्तींसोबत झाले होते. ते अट्टल नशेखोर असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिघींच्या नवऱ्यांचे शिक्षण पाचवी ते सहावीपर्यंत झाले होते.
कालू, ममता आणि कमलेश या तिघी कालूच्या मुलांसह बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलीस त्यांचा शोध घेत होते मात्र, त्यात त्यांना अपयश आले होते. एका स्थानिकाच्या म्हणण्यानुसार, कालू देवीला तिच्या सासरच्या लोकांनी मारहाण केल्यामुळे तिला १५ दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तिला डोळ्याला दुखापत झाली होती आणि ती नुकतीच रुग्णालयातून परत आली होती.

बालविवाह झाला होता

या तिघी बहिणींचे लग्न लहानपणीच झाले होते. सर्वात धाकटी बहीण त्यावेळी अवघ्या १ वर्षाची होती. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या तिघी बहिणी नोकरी करत करत शिक्षण घेत होत्या. ममता पोलीस कॉन्स्टेबलच्या परिक्षेत उर्त्तीर्ण झाली होती. कालू तिच्या बीए अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकत होता आणि सर्वात धाकटी बहीण कमलेश सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pregnant women kids murdered dowry demand bodies in well dpj

ताज्या बातम्या