नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात आर्थिक गैरव्यवहार आणि नवीन नोटांचे बंडल जप्त केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आता सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. बँकांनी कॅश काऊंटर आणि मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंतचे फुटेज सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानिर्णयानंतर पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे महिनाभरानंतर सर्वसामान्यांना चलनतुटवडा जाणवत असला तरी दुसरीकडे आयकर विभागाला नवीन नोटांचे बंडल आढळत आहेत. आत्तापर्यंत देशाच्या विविध भागांमधून कोट्यावधी रुपयांच्या नवीन नोटा सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सुचना दिल्या आहेत. यामध्ये नवीन नोटांच्या वितरणाचा तपशील ठेवण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. याशिवाय बँकेच्या आत महत्त्वाच्या ठिकाणी उदा. प्रवेशद्वार, हॉल आणि कॅश काऊंटर हे सीसीटीव्ही कॅमे-याच्या देखरेखीखाली असतील याची दक्षता घ्यावी असे आरबीआयच्या पत्रकात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preserve cctv recordings from november 08 to december 30 2016 says rbi
First published on: 13-12-2016 at 17:49 IST