मी असा पंतप्रधान नव्हतो जो माध्यमांशी बोलण्यासाठी घाबरत असे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टिकेला आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदींना बोलण्यासाठी कोणत्याही स्क्रिप्टची गरज नसते, असे खोचक विधान त्यांनी केले आहे. वृत्तसंस्था एएनआयशी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्वी म्हणाले, मनमोहन सिंग हे एक वरिष्ठ नेते आहेत. माजी पंतप्रधान आहेत जेव्हा ते पंतप्रधान होते. तेव्हा कुणा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन बोलत होते. आत्ताही ते तसंच करीत आहेत. त्यांना याची जाणीव असायला हवी की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही मदतशिवाय आणि स्क्रिप्टची किंवा दिग्दर्शकाची गरज नसते.

मी सायलेंट पंतप्रधान होतो, असं मला लोक म्हणत. पण मी न घाबरता पत्रकार परिषदांना सामोरे जाणारा पंतप्रधान होतो, असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले होते. याद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला होता. लोक मला ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हणतात, त्याचबरोबर मी ‘अॅक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टर’ही होतो, असेही ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modi does not need a script to speak naqvis manmohan singh replied
First published on: 19-12-2018 at 12:43 IST