Mumbai-GandhinagarVande Bharat Express : पंतप्रधान नरेद्र मोदी उद्या(३० सप्टेंबर) ‘मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर आगामी तीन वर्षांत अद्ययावत अशा ४०० वंदे भारत ट्रेन दाखल होणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

वंदे भारत ट्रेन हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी वंदे भारत ट्रेनने ७५ शहरांना जोडण्याबाबत ते बोलले होते. तेव्हापासून रेल्वे विभाग यावर वेगाने काम करत आहेत. हा प्रकल्प १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अंमलात आणण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.
२९ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार.

मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यात हिरवा झेंडा दाखवतील. यादरम्यान ते २९ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकासाशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटनही करतील आणि अनेक योजनांची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या डब्यांची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात येत आहे. जवळपास ४०० वातानुकूलित ‘वंदे भारत’ गाडय़ांची बांधणी करण्यात येणार आहे. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिजुअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये १६ वातानुकूलित डबे असतील. एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ आहे.