Who Is Priya Sachdev Kapoor: दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर ३०,००० कोटी रुपयांच्या उद्योग समूहाच्या नियंत्रणावरून सुरू असलेल्या वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. संजय कपूर यांची आई राणी कपूर यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी बोर्डाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रानंतर दिवंगत संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर चर्चेत आल्या आहेत.

संजय यांच्या आई राणी कपूर यांनी, त्या सोना ग्रुपमधील सर्वात मोठ्या भागधारक असल्याचे सांगत, आरोप केला की मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना “स्पष्टीकरण न देता विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले.” पत्रात “काही लोक” (प्रियांचा संदर्भ असल्याचे मानले जाते) कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याचा खोटा दावा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत एनडीटीव्हीच्या वृत्तात उल्लेख आहे.

प्रिया सचदेव कपूर कोण आहेत?

दिल्लीत जन्मलेल्या प्रिया सचदेव या ऑटोमोबाईल डीलर अशोक सचदेव यांची मुलगी आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून गणित आणि व्यवसाय व्यवस्थापनात पदवी मिळवली आहे. करिअरच्या सुरुवातीला प्रिया मॉडेलिंगमुळे प्रकाशझोतात आल्या होत्या. २००५ मध्ये आलेल्या नील ‘एन’ निक्की या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

प्रिया सचदेव यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्या सध्या सोना कॉमस्टारमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि कपूर कुटुंबाची गुंतवणूक फर्म ऑरियस इन्व्हेस्टमेंट मध्ये डायरेक्टर आहेत.

लंडनमध्ये व्यावसायिक प्रवासाची सुरुवात

प्रिया यांनी लंडनमधील Credit Suisse First Boston मधून व्यावसायिक प्रवासाची सुरुवात केली आणि नंतर ऑटोमोटिव्ह रिटेल, विमा, फॅशन आणि ई-कॉमर्समधील व्यवसायांचे नेतृत्व करण्यासाठी भारतात परतल्या, असे त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये नमूद आहे.

पुढे प्रिया यांनी TSG मार्केटिंग कंपनीची स्थापना केली आणि भारतातील सुरुवातीच्या लक्झरी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या रॉक एन शॉप ची सह-स्थापना केली. त्या दिवंगत पती संजय कपूर यांनी स्थापन केलेल्या ऑरियस पोला या टीमचेही नेतृत्व करतात.

संजय कपूर आणि करिश्मा कपूर

प्रिया सचदेव यांनी २०१७ मध्ये दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्याशी विवाह केला. दरम्यान, संजय कपूर यांचे पहिले लग्न बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी झाले होते. २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला होता. करिश्मा कपूरला संजय कपूर यांच्यापासून दोन मुलं आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ जून रोजी इंग्लंडमध्ये एका पोलो सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूर यांचे निधन झाले. प्रिया आणि संजय यांना अझारियास नावाचा मुलगा आहे.