Priyanka Gandhi Slams PM Narendra Modi over Falling Value Of Rupee : अमेरिकी चलनाची वाढती मजबुती आणि परदेशी गुंतवणुकीचे मोठ्या प्रमाणात देशाबाहेर सुरू असलेल्या गमनापुढे रुपयाचा प्रतिकार अपयशी ठरला असून, शुक्रवारच्या सत्रात रुपया आणखी १८ पैशांनी घसरला आणि इतिहासात पहिल्यांदाच रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८६.०४चा टप्पा गाठला आहे. चिंतेची बाब म्हणजे रुपयाच्या निरंतर गटांगळीचा हा सलग १० वा आठवडा असून, यातून रिझर्व्ह बँकेकडील परकीय गंगाजळीही वेगाने आटत चालली आहे. यानंतर काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी शनिवारी केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मुद्द्यावर उत्तर मागितले आहे.

पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे

आज प्रियांका गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत रुपया सतत घसरत असल्याचे कारण देत पंतप्रधानांनी याबाबत देशातील जनतेला उत्तर द्यावे असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. इतिहासात पहिल्यांदाच डॉलरची किंमत ८६.०४ रुपये झाली आहे.”

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
Rupee VS Dollar
Rupee VS Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकावर; कारण काय?

प्रियांका गांधी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणाल्या, “डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात, जेव्हा डॉलरची किंमत ५८-५९ रुपये होती, तेव्हा नरेंद्र मोदी रुपयाच्या मूल्याला सरकारच्या प्रतिष्ठेशी जोडत असायचे. ते म्हणायचे, मला सगळं माहिती आहे. कोणत्याही देशाचे चलन असं घसरू शकत नाही. आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आणि रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले आहेत. त्यांनी देशातील जनतेला याचे उत्तर द्यावे.”

दरम्यान, २०१३ मध्ये जेव्हा यूपीए सरकारच्या काळात रुपयाची किंमत (Dollar vs Rupee) घसरली होती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार टीका केली होती.

हे ही वाचा : Digital Arrest Scam: ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमद्वारे देशभरात हजारो कोटींची लूट करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक

गेल्या काही आठवड्यांपासून परकीय चलन साठ्यात सतत घट सुरू आहे. तसेच रुपयातील अस्थिरता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून चलन बाजारात सुरू राहिलेल्या हस्तक्षेपातून ही घसरण वाढत आहे. सप्टेंबरअखेर भारतीय रिझर्व्ह बँकेकडील परकीय चलन साठा ७०४.८८५ अब्ज डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर होता, त्या पातळीवरून तो तीन महिन्यांत ७० अब्ज डॉलरहून अधिक गडगडला आहे. युरो, पौंड आणि येन सारख्या गैर-अमेरिकी चलनांचे मधल्या काळात झालेले अवमूल्यन हे एकूण चलन मालमत्तेच्या ऱ्हासास कारणीभूत ठरले आहे. गंगाजळीतील सुवर्ण साठा मात्र गेल्या आठवड्यात वाढून ६७.०९२ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला आहे.

Story img Loader