भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीच्या निषेधार्थ १० जूनला राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांत शुक्रवारी निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनांना अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळालं होतं. दरम्यान या शुक्रवारी पुन्हा एकदा या आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योगी सरकारने तयारी केली आहे. लखनऊ, नोएडा, गाजियाबाद, मथुरा, सहारनपूर, अमरोहा, चंदोली, मुझफ्फरनगर, ओरेया, मुरादाबाद, कानपूर आणि प्रयागराज येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी पोलीस रस्त्यांवर फ्लॅगमार्च करत आहेत तर काही ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूरसह अन्य चार शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने करण्यात आली होती. सहारनपूर आणि प्रयागराज शहरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी सहा जिल्ह्यांतील शंभराहून अधिक निदर्शकांना अटक केली होती. प्रयागराजमध्ये निदर्शकांनी काही वाहनांची जाळपोळ केली आणि पोलिसांची वाहनेही जाळण्याचा प्रयत्न केला होता. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर केला होता.

दरम्यान यावेळी प्रयागराजमधील आंदोलकांना रोखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांना मल्टिसेल लाँचर देण्यात आले आहेत. यामधून एकाच वेळी रबर बुलेट, अश्रूधूर आणि सहा गोळ्यांचा मारा केला जाऊ शकतो. याशिवाय १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर नमाजच्या आदल्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवलं जात आहे. कोणी घऱाच्या छतावर दगड जमा करुन ठेवले आहेत का? तसंच इतर काही हालचाली सुरु आहेत यावर नजर ठेवली जात आहे.

गोरखपूरमध्ये पोलिसांनी मॉक ड्रिल करत सुरक्षेच्या व्यवस्थेची पाहणी केली. जेणेकरुन कोणी दगडफेक केल्यास लगेच कारवाई करता येईल.

कानपूरमध्येही पोलिसांनी पूर्ण तयार केली असून आठ ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवत आहेत. पीएसीच्या (Provisional Armed Constabulary) १२ तुकड्यांसोबत रॅपिड अॅक्शन फोर्सलाही तैनात करण्यात आलं आहे. तसंत पोस्टरच्या सहाय्याने लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पीएसच्या १३०, आरएएफ आणि सीएपीएफच्या १० तुकड्या तैनात आहेत. याशिवाय सोशल मीडियावरही कोणी माथी भडकणाऱ्या पोस्ट करु नयेत यावर लक्ष ठेवलं जात आहे.

गेल्या शुक्रवारी काय घडले?

  • कोलकात्यात पोलिसाच्या गोळीबारात महिला ठार, डोक्यात गोळी झाडून पोलिसाचीही आत्महत्या
  • दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीबाहेर नमाजानंतर जमावाची निदर्शने, नूपुर शर्मा, जिंदल यांच्या अटकेची मागणी

*जामिया मिलिया इस्लामियामध्ये विद्यार्थ्यांचेही निषेध आंदोलन

  • उत्तर प्रदेशात अनेक जिल्ह्यांत निदर्शने, प्रयागराज येथे दगडफेक, सहारणपूरमध्ये अनेक अटकेत
  • गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोद्यात बंद, रास्ता रोको
  • झारखंडमध्ये जमावाला पांगवताना काही पोलीस जखमी, हवेत गोळीबार, भागांत संचारबंदी
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prophet muhammad row uttar pradesh friday namaz violence police security arrangement yogi government nupur sharma sgy
First published on: 17-06-2022 at 13:01 IST