पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. दिवसाढवळ्या एका तरुणीचे ऑफीसमधून अपहरण करून तिच्यावर निर्जनस्थळी बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना २५ मार्च रोजी घडली होती. त्यानंतर या आरोपीने शुक्रवारी न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी एक युवक तरुणीला खेचत नेत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. मिळालेल्या सीसीटीव्ही फूटेजनुसार लाल रंगाचा शर्ट घातलेला इसम त्या तरूणीला जबरदस्तीने ओढून घेऊन जाताना दिसत असून ती तरूणी मदतीसाठी हाका मारतानाही दिसत आहे. मात्र कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही. तरुणीचे अपहरण केल्यानंतर तिला तापा खेर गावात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पाच दिवसांनी तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपीचे नाव गुरींदर असे आहे. हा आरोपी व पीडित तरुणी एकाच गावचे रहिवासी असून तो आरोपी त्या महिलेला ओळखतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुक्तसरचे एसएसपी गुरप्रीत सिंग यांनी सदर युवकाने शरणागती पत्करल्याची माहिती दिली असून, त्याला तीन दिवसांसाठी पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab man charged with abduction and rape of dalit girl surrenders in muktsar
First published on: 23-04-2016 at 14:50 IST