Pushpa 2 stampede case Allu Arjun bouncer Anthony arrested : तेलुगु चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुन याचा बाउन्सर अँथनी याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ‘पुष्पा २ : द रूल’ चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान हैदराबाद येथील संध्या चित्रपटगृहाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रीमियरवेळी बाउन्सर्सची व्यवस्था केल्याचा आणि अल्लू अर्जुनला पाहाण्यासाठी गोळा झालेल्या चाहत्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ही धक्काबुक्की केल्यानेच येथे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितेल जात आहे.

४ डिसेंबर रोजी पुष्पा २ : द रूल या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीवेळी एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर त्या महिलेचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. मुलावर सध्या हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे सार्वजनिक कार्यक्रमावेळी नागरिकांची सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चेंदराचेंगरीच्या घटनेनंतर हैदराबाद पोलिसांकडून या प्रकारणाची सविस्तर चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन आणि सहभागी इतरांची देखील चौकशी केली जात आहे. अभिनेता अल्लू अर्जुन याला चित्रपटगृहात उपस्थित राहण्याची तसेच बाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटण्याची परवानगी होती का? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तसेच यंत्रणांकडून चित्रपटगृहाच्या मॅनेजमेंट आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची भूमिका देखील तपासली जात आहे.

सुकुमार यांनी दिग्दर्शीत केलेला पुष्पा २ : द रुल याने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर यांच्यानुसार अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने भारतीय बॉक्स ऑफीसवर ७०० कोटींचा गल्ला जमवला आहे. हा पराक्रम करणारा पुष्पा २ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

पुष्पा २ ची बॉक्स ऑफिसवर कमाई किती?

दुसरीकडे ‘पुष्पा २’ने सध्या जगभरातही धुमाकूळ घातला असून पहिल्याच दिवशी तब्बल १६४.२५ कोटींची कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक नवीन रेकॉर्ड बनवला होता. आता येत्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा १६०० कोटींच्या घरात प्रवेश करत ‘बाहुबली २’ आणि ‘दंगल’ या दोन सिनेमांच्या ऑल टाइम कलेक्शनला टक्कर देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा>> Video: “तुम्ही मालकीण जरी असला, तरी…”, भुवनेश्वरीने अक्षरावर उगारला हात, अक्षराचे सडेतोड उत्तर; पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुष्पा २’ने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या आठवड्यात देशभरात ७२५.८ कोटींची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २६४.८ कोटी कमावले. यानंतर बॉक्स ऑफिसवर १६ व्या दिवशी १४.३ कोटी, १७ व्या दिवशी २४.७५ कोटी आणि १८ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी या चित्रपटाने ३२.९५ कोटी कमावले. तिसऱ्या सोमवारी (१९ वा दिवस – २३ डिसेंबर) चित्रपटाच्या कमाईत ६२ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. १९ व्या दिवशी पुष्पा २ ने फक्त १२.२५ कोटी कमावले आहेत.