कंदीलच्या हत्येपूर्वी तीन दिवस आधी बुधवारी पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलसमोर कंदीलशी आपले लग्न झाल्याचे दावा एका व्यक्तीने केला आणि सोशलमीडियावर या गौप्यस्फोटानंतर  चांगलीच खळबळ उडाली होती.

कंदीलने देखील या वृत्ताला दुजोरा दिला होता.  आशिक हुसेन असे तिच्या पतीचे नाव असून त्यांना एक मुलगाही आहे.

एक्सप्रेस न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपले लग्न झाल्याचे देखील कंदीलने मान्य केले होते तसेच आपला नवरा आपल्याला मारायचा असेही तिने सांगितले. आपले लग्न जबरदस्तीने हुसेनशी  लावून दिल्याचे देखील तिने म्हटले होते. तसेच हुसेनेने मुलापासून मी त्याची आई असल्याचे लपवल्याचा आरोपही तिने केला होता.

वयाच्या सतराव्या वर्षी तिचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर नव-याच्या छळाला कंटाळून पळून गेल्याचेही तिने या मुलाखतीत सांगितले होते.

तर हुसेनने एक्सप्रेस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कंदीलचा आणि त्याचा विवाह हा प्रेमविवाहच होता असे म्हणून कंदीलचे आरोप फेटाळून लावले होते. कंदीलने मला रक्ताने प्रेमपत्र लिहली होती असेही तिच्या नव-याने मुलाखतीत म्हटले होते. कंदीला माझ्याकडून बंगला, गाडी हवी होती म्हणून तिने मला सोडले असेही तिच्या नव-याने मुलाखतीत म्हटले.

कंदीलच्या हत्येपूर्वी तीन दिवस आधी कंदीलच्या लग्नाचा मुद्दा सोशल मीडियावर दिवसभर चर्चेत होता.