scorecardresearch

Queen Elizabeth II Death : कोहिनूर मुकुटाचे काय होणार? जाणून घ्या

१०५.६ कॅरेटचा कोहिनूर हा एक प्राचीन हिरा आहे. १४ व्या शतकात हा हिरा भारतात सापडला होता. त्यानंतर शतकानुशतके या हिऱ्याचे मालक बदलत गेले.

Queen Elizabeth II Death : कोहिनूर मुकुटाचे काय होणार? जाणून घ्या
(फोटो सौजन्य-रॉयटर्स)

ब्रिटनचे महाराणी पद सर्वाधिक काळ भुषवणाऱ्या एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाले. प्रकृतीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय उपचार सुरू असताना वयाच्या ९६ व्या वर्षी महाराणी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. महाराणी यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या समाप्तीनंतर प्रिन्स चार्लस ब्रिटनच्या सिंहासनाचे उत्तराधिकारी आहेत. महाराणी यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर मुकुटाचे काय होणार याबाबत जगभरात उत्सुकता आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ सुरू, वाचा अंत्यविधीचे नियोजन कसे असणार

या वर्षाच्या सुरवातीला महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली होती. प्रिन्स चार्ल्स ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान होताच त्यांच्या पत्नी कॅमिला यांना प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याचे मुकुट मिळेल, असा आदेश महाराणीने काढला होता, याबाबतचे वृत्त आहे. १०५.६ कॅरेटचा कोहिनूर हा एक प्राचीन हिरा आहे. १४ व्या शतकात हा हिरा भारतात सापडला होता. त्यानंतर शतकानुशतके या हिऱ्याचे मालक बदलत गेले.

Queen Elizabeth II Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन

१८४९ साली ब्रिटिशांनी भारतातील पंजाबवर ताबा मिळवल्यानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुकुटात सजवण्यात आला. तेव्हापासूनच हा हिरा ब्रिटनच्या राजमुकुटाचा अविभाज्य भाग आहे. या ऐतिहासिक हिऱ्याच्या मालकीवरुन भारतासह चार देशांमध्ये अनेक शतकांपासून वाद सुरू आहेत. जॉर्ज सहावे यांच्या १९३७ मधील राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांच्या आई महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी प्लॅटिनम धातूच्या मुकुटामध्ये हा हिरा सजवण्यात आला होता. हा मुकुट लंडन टॉवरमध्ये एका प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या २५ व्या वर्षी ६ फेब्रुवारी १९५२ रोजी ब्रिटनचे महाराणी पद स्वीकारले होते. त्यांचे वडील जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर त्या ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या. २० नोव्हेंबर १९४७ रोजी त्यांचा प्रिन्स फिलीप यांच्याशी विवाह झाला होता. फिलीप यांचे गेल्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर गुरुवारी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनीही जगाचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Queen elizabeth kohinoor crown will go to prince charles wife camilla rvs

ताज्या बातम्या