अयोध्येत Radisson Hotel Group ने आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, अयोध्येत १५० खोल्यांचं Radisson Blu Hotel तयार करण्यात येणार असून त्यासाठी EaseMyTrip बरोबर करार करण्यात आला आहे. EaseMyTrip च्या भागीदारीत जीवनी हॉस्पिटॅलिटीद्वारे एक ग्रीनफील्ड प्रकल्प, हॉटेल विकसित केले जात आहे आणि ते २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हे रॅडिसन हॉटेल ग्रुपचे अयोध्येतील दुसरे हॉटेल आहे.

हे हॉटेल अयोध्येच्या श्री राम मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे . हे महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या रेल्वे स्थानकापासून सोयीस्कर अंतरावर आहे आणि पुढे राष्ट्रीय महामार्ग-२७ जवळ आहे. “पाहुणे २-५ किलोमीटरच्या आत असलेली इतर धार्मिक स्थळे देखील पाहू शकतात. हनुमान घरी, कनक भवन, नागेश्वरनाथ मंदिर आणि त्रेता के ठाकूरसारख्या धार्मिक स्थळांचे ते भेट घेऊ शकतात”, असे एका निवेदनात म्हटले आहे.

dubai flood
Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO
Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…
one dead in Accident on JNPT Palaspe National Highway
जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू
Pune, Pune Ring road
पुणे : आचारसंहितेमुळे रिंगरोडच्या भूसंपादनाला ब्रेक

अयोध्या आश्वासक बाजारपेठ

“रॅडिसन ब्लू हॉटेल, अयोध्या हे आमच्या आमच्या विस्तार धोरणातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. अयोध्या हे रॅडिसन हॉटेल समूहासाठी एक आश्वासक बाजारपेठ म्हणून मजबूत आहे, जे २०२४ आणि त्यानंतरच्या आमच्या विस्तार योजनांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे”, असे रॅडिसन हॉटेल ग्रुपचे दक्षिण आशिया अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार केबी कचरू यांनी म्हटलंय.

EaseMyTrip चे CEO आणि सह-संस्थापक आणि Jeewani Group मधील गुंतवणूकदार निशांत पिट्टी म्हणाले, “रेडिसन हॉटेल ब्लू उघडण्यासाठी Radisson Hotel Group बरोबर भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. हे सहकार्य शहरातील आदरातिथ्य अनुभव देण्यासाठी बांधिलकी दर्शवते. आम्ही आदरातिथ्य उद्योगात नवीन बेंचमार्क स्थापित करण्याचे आणि अयोध्येत एक ऐतिहासिक स्थळ निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.”

“रॅडिसन ब्लू हॉटेल, अयोध्या सुरू करण्यासाठी रॅडिसन हॉटेल ग्रुपसोबत सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. या सहकार्याद्वारे, अयोध्येला भेट देणाऱ्या पाहुण्यांना या क्षेत्रातील आमच्या कौशल्याच्या मिश्रणासह जागतिक दर्जाचे आदरातिथ्य अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध जागतिक नेत्याबरोबर आम्ही सामील झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की ही मालमत्ता शहरातील एक प्रतिष्ठित खुण बनेल”, जीवनी हॉस्पिटॅलिटीचे संचालक ध्रुव जीवनी म्हणाले.

Radisson Hotel Group ची भारतात १६५ हून अधिक हॉटेल्स कार्यरत आहेत आणि विकसित होत आहेत. हे दिल्ली एनसीआर सारख्या टियर-I मार्केटमध्ये सर्वात मोठे हॉटेल ऑपरेटर आहे आणि त्याच वेळी, पोर्टफोलिओच्या ५० टक्क्यांहून अधिक टियर-II आणि -III मार्केटमध्ये आहे.