लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर नवा बॉम्ब टाकला आहे. ब्राझीलमधल्या मॉडेलने हरियाणात १० वेळा मतदान केल्याचे राहुल यांनी सादरीकरणात दाखवून दिले. स्क्रीनवर सादरीकरण देत राहुल म्हणाले की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराने काहीतरी चुकीचे असल्याचे सांगितले होते. राहुल गांधी म्हणाले एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे दाखवले होते. सर्व पोल हे भाकीत करत होते, पण असे काय झाले की हरियाणामध्ये पहिल्यांदाच पोस्टल मत आणि प्रत्यक्ष मतांमध्ये तफावत दिसून आली? आम्ही तपशीलवार शोध घेतला आणि ब्राझीलच्या मॉडेलचं नाव आम्हाला दिसलं.
राहुल गांधी ब्राझीलच्या मॉडेलबाबत काय म्हणाले?
राहुल म्हणाले की, हरियाणाच्या प्रत्यक्ष मतदान यादीत, एकाच महिलेचा फोटो अनेक ठिकाणी दिसतो. काही लोकांचे वय त्यांच्या फोटोंपेक्षा वेगळे असते. मी तुम्हाला विचारतो, ही यादी काय आहे? ही मतदान केंद्रांची यादी आहे. एक महिला दोन मतदान केंद्रांवर २२३ वेळा दिसते. निवडणूक आयोगाने हे स्पष्ट करावे की ही महिला इतक्या वेळा का दिसली. म्हणूनच निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज काढून टाकतो. हरियाणात अशी हजारो उदाहरणे आहेत. जर सीसीटीव्ही फुटेज नसेल तर कोणालाही कळणार नाही. मला हरियाणाच्या जनतेला हा प्रश्न विचारायचा आहे की ही कोण आहे?
ब्राझीलच्या मॉडेलने २२ वेळा केलं मतदान-राहुल गांधी
निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे. हा ठोस पुरावा आहे. राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवला आणि विचारले, “निवडणुकीत तिची भूमिका काय आहे?” ते म्हणाले की, माझा एक प्रश्न आहे: हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन मुलीची भूमिका काय आहे? हरियाणातील पाच श्रेणींमध्ये २५ लाख मते चोरीला गेली. एका विधानसभा मतदारसंघात एका महिलेने २२ वेळा मतदान केले. या महिलेने सरस्वती, स्विटी, संगिता अशा विविध नावांनी मतदान केलं आहे. ही मॉडेल ब्राझीलची आहे. ती हरियाणाच्या मतदार यादीत आहे. तुम्ही तपासून पाहू शकतात. यावरुन हे कळतं आहे की ही खास मोडस ऑपरेंडी आहे. केंद्राकडून हे नाव टाकण्यात आलं आहे. ब्राझीलच्या महिलेने १० बूथवर २२ वेळा मतदान केलं आहे. हरियाणात पाच कॅटेगरीमध्ये २५ लाख मतांची चोरी झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसंच सीसीटीव्ही फुटेज हेतुपुरस्सर गायब करण्यात आलं असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.
