Rahul Gandhi Meet Ilhan Omar : भारताविरोधी भूमिका मांडणाऱ्या इल्हान ओमर यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भेट घेतली. या भेटीवरून भाजपाने राहुल गांधी यांना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांचा अमेरिकन दौरा आधीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. त्यातच, या भेटीची भर झाल्याने भारतात परतल्यावर त्यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

इल्हान ओमर या कायम भारताविरोधीत भूमिका मांडतात. राहुल गांधी यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यात मंगळवारी अमेरिकेतली अनेक खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इल्हान ओमर यांचीही भेट घेतली.

या बैठकीवर भारतातील भाजपा नेत्यांकडून टीकेची झोड उठली. बुधवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना राज्यसभेचे खासदार आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “राहुल गांधी हे भारतविरोधी विष पसरवण्यासाठी ओळखले जातात, परंतु यावेळी त्यांनी जे केले ते चिंताजनक आहे. अमेरिकेला भेटणारे ते पहिले विरोधी पक्षनेते ठरले. खासदार इल्हान या भारतविरोधी भूमिका घेण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.” सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “राहुल गांधी बालिशपणाने वागत नाहीत, तर धोकादायकपणे वागत आहेत. ते आता जे करत आहेत ते भारतविरोधी घटकांना आवडेल.

हेही वाचा >> Rahul Gandhi : “शिखांना पगडी व कडं परिधान करण्याची…”, राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपाचा संताप; म्हणाले, “काँग्रेसने कत्तली घडवून…”

भारतविरोधी घटकांना राहुल गांधी का भेटतात?

भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनीही यावरून टीका केली. ते X वर एका पोस्टमध्ये म्हणाले, “राहुल गांधींना तिला का भेटावे लागले? ते प्रत्येक परदेश दौऱ्यावर अत्यंत कट्टर भारतविरोधी घटकांना का भेटतात? भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही राहुल गांधींच्या ओमर यांच्या भेटीचा निषेध केला. त्यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पाकिस्तानी नेतेदेखील अशा उद्धट घटकांबाबत अधिक सावध राहतील. काँग्रेस आता उघडपणे भारताविरोधात काम करत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचा प्रतिवाद

या टीकेवर प्रत्युत्तर देताना काँग्रेसने म्हटलं की, उमर हे राहुल गांधींना भेटलेल्या अमेरिकन शिष्टमंडळाचा भाग होत्या. “भाजपाच्या नेत्यांनी आज पहिल्यांदा इल्हान उमरचे नाव ऐकले. ती एक काँग्रेस महिला आहे आणि शिष्टमंडळाचा एक भाग म्हणून आली होती,” काँग्रेस नेते पवन खेरा यांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले.