टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादकपदी राहुल शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या वाहिनीचा नुकताच राजीनामा दिलेल्या अर्णव गोस्वामी यांची ते जागा घेतील. राहुल शिवशंकर हे सध्या न्यूज एक्स या वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक असून त्यांनी यापूर्वी टाइम्स नाऊ वाहिनीत काम केलेले आहे.

[jwplayer zkvFlBpu-1o30kmL6]

राहुल शिवशंकर हे गेल्या २० वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. यापूर्वी त्यांनी इंडिया टुडे, हेडलाइन्स टुडे आणि न्यूज एक्स यासारख्या मोठ्या समूहात काम केलेले आहे. यापूर्वी या वाहिनीचे मुख्य संपादक असलेल्या अर्णव गोस्वामींचा ‘न्यूज अवर’ हा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय होता. अर्णव गोस्वामी हे आपल्या आक्रमक निवेदन शैलीसाठी प्रसिद्ध होते. टाइम्स समूहाबरोबर सुमारे एक दशकाहून अधिक काळ काम केल्यानंतर त्यांनी एक नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला होता. आता राहुल शिवशंकर यांची या जागी नियुक्ती झाल्याचे सांगण्यात येते.

[jwplayer 1yLms27W-1o30kmL6]